आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे SRK:वडिलांची डेडबॉडी बघून बेशुद्ध पडली होती शाहरुख खानची बहीण, जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा आयुष्य कामयसाठी बदलले होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'तुझे देखा तो ये जाना...' गाण्याच्या शूटिंगच्या काळात सुरु होते शहनाजवर उपचार

अभिनेता शाहरुख खानने आज (2 नोव्हेंबर) वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याच्या पत्नी आणि मुलांना सर्वच ओळखतात, पण त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती अशी आहे, जी कायम लाइमलाइटपासून दूर राहते. ही व्यक्ती आहे शाहरुखची थोरली बहीण शहनाज लाला रुख खान. 61 वर्षीय शहनाज वडिलांची डेडबॉडी बघून डिप्रेशनमध्ये गेली होती.

  • घरी परतली तेव्हा वडिलांचे पार्थिव शरीर होते समोर

शाहरुखच्या वडिलांचे 1981 मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले होते. असे म्हटले जाते की, जेव्हा शाहरुखच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा शहनाज त्यांच्याजवळ नव्हती. त्यावेळी ती बाहेर गेली होती. जेव्हा ती घरी परतली तेव्हा वडिलांचे मृत शरीर बघून ती बेशुद्ध पडली होती. या घटनेने तिला मोठा धक्का बसला होता, शुद्धीवर आल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतर ती कायम आजारी राहू लागली होती.

  • शहनाजला मोठ्या धक्क्यातून सावरायला लागली होती 2 वर्षे

एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते, "शहनाजला वडिलांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला होता, त्यामुळे ती तिचे मानसिक संतुलन गमावले होते. दोन वर्षे तिला या धक्क्यातून सावरायला लागली होती. ती रडायची, किंचाळायची. तिच्या चेह-यावर वडिलांना गमावल्याचे दुःख स्पष्ट झळकत होते. डीडीएलजे (दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे) च्या शूटिंगच्या काळात तिची तब्येत खूप बिघडली होती, त्यामुळे मी तिला उपचारांसाठी स्वित्झर्लंडला घेऊन गेलो होतो."

  • 'तुझे देखा तो ये जाना...' गाण्याच्या शूटिंगच्या काळात सुरु होते शहनाजवर उपचार

शाहरुखने सांगितल्यानुसार, "मी जेव्हा 'तुझे देखा तो ये जाना सनम' या गाण्याचे चित्रीकरण करत होतो, त्याचकाळात स्वित्झर्लंडमध्ये शहनाजवर उपचार सुरु होते. उपचारांनंतर तिची अवस्था पुर्वीपेक्षा बरी झाली होती, पण ती पूर्णपणे ठीक होऊ शकली नाही."

  • शहनाजच्या 'लाला रुख' नावामागे आहे ही कहाणी

शहनाज शाहरुखपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. ती शाहरुखच्या तुलनेत वडील मीर ताज मोहम्मद यांच्या अधिक जवळ होती. शहनाजच्या वडिलांनीच तिचे मिडल नेम'लाला रुख' असे ठेवले, याचा अर्थ कोमल आणि सुंदर असा होतो. शाहरुखच्या वडिलांचे जवळचे मित्र कन्हैयालाल यांना त्यांच्या मुलीच्या जन्माच्या वेळी हे नाव सुचवले होते. पण कन्हैयालाल यांना हे नाव पसंत पडले नव्हते. काही वर्षांनी जेव्हा मीर ताज मोहम्मद यांच्या घरी मुलीचा जन्म झाला तेव्हा तिचे नाव 'लाला रुख' ठेवण्यात आले.

शाहरुख आणि गौरीसोबत शहनाज - फाइल फोटो
शाहरुख आणि गौरीसोबत शहनाज - फाइल फोटो
  • शहनाजला पसंत नाही कॅमे-यासमोर येणे

शाहरुखच्या उलट शहनाजला कॅमे-यासमोर येणे मुळीच पसंत नाही. ती पार्टी किंवा पब्लिकली फार क्वचित दिसत असते. सुपरस्टारची बहीण असूनदेखील ती अतिशय साधे आयुष्य व्यतीत करत आहे.