आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉप सिंगर शकीरा हिच्यावर 117 कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचा आरोप आहे. 'वाका-वाका' आणि 'हिप्स डोंट लाय' सारख्या गाण्यांनी शकीराने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. शकीराने 3 ग्रॅमी आणि 12 लॅटिनसह 333 पुरस्कार जिंकले आहेत. दुसरीकडे, नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर शकीरा 2037 कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.
शकीराने 1990 मध्ये सोनी म्युझिकमधून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता ती जगातील सर्वोत्तम गायकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिचे जगभरात 80 मिलियन रेकॉर्ड्स विकले गेले आहेत. सध्या 2012 ते 2014 पर्यंत कर न भरल्याचा आरोप तिच्यावर असून या खटल्याची सुनावणी अद्याप सुरु आहे. चला तर मग आज शकीराची लाइफस्टाइल आणि नेटवर्थ यावर एक नजर टाकुया.
स्पेनमध्ये 46 कोटींचा बंगला
शकीराने काही वर्षांपूर्वी स्पेनमध्ये तिचा एक्स पार्टनर जेरार्ड पिकेसोबत एक आलिशान बंगला खरेदी केला होता, ज्याची किंमत सुमारे 46 कोटी रुपये आहे. या बंगल्यात दोन किचन, स्विमिंग पूल, खाजगी थिएटर, धबधबा आणि भव्य खोल्या आहेत. या घराचा जलतरण तलाव तीन घरांना जोडतो. याव्यतिरिक्त, गायिकेचे उरुग्वेमध्ये वैयक्तिक फार्म आहे. तिचे शेत फारो जोस इग्नासिओच्या गावात असून ते 12 एकर क्षेत्रात आहे. याशिवाय बहामासमध्ये येथे शकीराचे एक खासगी बेट आहे ज्याची किंमत 118 कोटी रुपये आहे.
खासगी विमान आणि कोट्यवधींच्या वाहनांची मालकीण आहे शकीरा
शकीराला लक्झरी वाहनांचीही शौकीन आहे. तिच्याकडे दीड कोटी रुपयांची टेस्ला मॉडेलची कार आहे. तसेच मर्सिडीज एसएल 550 सारखी वाहने तिच्या कलेक्शनमध्ये आहेत. याशिवाय शकीराकडे खासगी विमानही आहे.
मुलांच्या कस्टडीवरुन आहे चर्चेत
कर प्रकरणाव्यतिरिक्त शकीरा तिच्या मुलांच्या कस्टडीच्या वृत्तामुळेही चर्चेत आहे. 2010 मध्ये फिफा वर्ल्ड कपनंतर शकीरा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान फुलबॉलर जेरार्ड पीकेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघे 12 वर्षे एकत्र होते. दोघांनी लग्न केले नसले तरी या जोडप्याला दोन मुले आहेत. फोर्ब्सने शकीरा आणि जेरार्डचा समावेश मोस्ट पॉवरफुल कपल्सच्या यादीत केला आहे. आता 12 वर्षांनंतर दोघेही वेगळे होणार असून मुलांच्या कस्टडीवरुन हे कपल चर्चेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.