आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धाच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया:श्रद्धा कपूर रोहन श्रेष्ठसोबत लग्न करणार का? वडील शक्ती म्हणाले - मला सांगितले नाही, परंतु मी प्रत्येक निर्णयामध्ये तिच्याबरोबर आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शक्ती म्हणाले - 'श्रद्धाने लग्नाच्या नियोजनाबद्दल सांगितले नाही'

अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठबरोबर लग्न करू शकते असा संकेत अभिनेता वरुण धवनने सोशल मीडियावर दिला होता. वरुणची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर श्रद्धाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मुलाखतीत शक्ती कपूर म्हणाले की, श्रद्धा आणि रोहन खूप चांगले मित्र आहेत. परंतु त्यांची मुलगी रोहनबद्दल इतकी गंभीर आहे की नाही हे त्यांना ठाऊक नाही. पण श्रद्धाच्या निर्णयामध्ये ते कायम तिच्या पाठीशी उभे राहतील.

'श्रद्धाने लग्नाच्या नियोजनाबद्दल सांगितले नाही' ई-टाईम्सशी बोलताना शक्ती म्हणाले, "रोहन खूप चांगला मुलगा आहे. त्याचे कायम घरी येणे-जाणे असते. तो लहानपणापासूनच घरी येत आहे. श्रद्धा आणि रोहन बालपणीचे मित्र आहेत. पण त्याच्यासोबत लग्न करणअयाचा विचार कधी केल्याचे श्रद्धाने मला सांगितलेले नाही. ते दोघेही एकमेकांबद्दल गंभीर आहेत की नाही हे मला माहित नाही."

'मुलीच्या प्रत्येक निर्णयात मी तिच्या पाठीशी उभा आहे'

शक्ती कपूर पुढे म्हणाले, "रिपोर्ट्समध्ये काय म्हटले गेले, हे मला माहित नाही. मात्र मुलीच्या प्रत्येक निर्णयामध्ये मी तिच्या पाठीशी उभा आहे. मग तो तिच्या लग्नाचा निर्णय का असेना, मग तो रोहन श्रेष्ठच असो की दुसरा कुणी? तिला तिच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करुन सेटल व्हायचे असेल, तर मला हरकत नाही. "

शक्ती कपूर रोहनच्या वडिलांना आधीपासून ओळखतात
शक्ती कपूर यांच्या म्हणण्यानुसार, ते रोहनचे वडील राकेश श्रेष्ठ यांना फार पूर्वीपासून ओळखतात. त्यांनी फक्त राकेश श्रेष्ठसोबत अनेक फोटोशूटच केले नाहीत, तर अनेकदा त्यांनी एकत्र डिनर आणि ड्रिंक्सही घेतले आहेत. राकेश त्यांचे खूप चांगले मित्र आहेत.

कशी सुरु झाली श्रद्धा-रोहनच्या लग्नाची चर्चा
झाले असे की, अभिनेता वरुण धवन अलीकडेच लग्नगाठीत अडकला. लग्नानंतर विविध माध्यमांतून वरुण आणि नताशा या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे वरुणदेखील शक्य तितक्या जणांना रिप्लाय देतोय. बुधवारी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचेदेखील आभार मानले होते. यामध्येच प्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा याच्या पोस्टला वरुणने रिप्लाय दिला आहे. विशेष म्हणजे वरुणने केवळ रिप्लायच दिला नाही तर रोहन आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाचे एक प्रकारे संकेतच दिले आहे.

“वरुण आणि नताशा खूप शुभेच्छा. एकदा का तुम्हाला समजलं की मग सारं काही आपोआप समजू लागतं. वरुण धवन तू नशीबवान आहेस”, असं म्हणत रोहनने वरुण-नताशाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर वरुणनेदेखील त्याला रिप्लाय दिला. वरुणने रोहनची ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती. यावर, “खरंच मी नशीबवान आहे. आशा आहे तू सुद्धा या सगळ्यासाठी तयार असशील”, असा रिप्लाय वरुणने दिला. विशेष म्हणजे वरुणचा हा रिप्लाय पाहून नेटकऱ्यांनी याचा संबंध थेट श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठाच्या लग्नाशी जोडला आहे.

रोहनसोबत श्रद्धाच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक काळापासून आहे. पण, या दोघांनीही त्यांच्या नात्याला अत्यंत सिक्रेट ठेवले आहे. श्रद्धाला अनेकदा रोहनसोबत बघितले गेले आहे. अनेक इव्हेंट्समध्ये ते सोबत दिसले आहेत.

बातम्या आणखी आहेत...