आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशक्ती कपूर हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. नकारात्मक भूमिकांसाठी ते ओळखले जातात. पण एक काळ असा आला होता, जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा विचार केला होता. अलीकडेच त्यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये याचा खुलासा केला. करिअरच्या सुरुवातीच्या काळातच आपले करिअर संपले, असे त्यांना वाटले होते. हा किस्सा 'मवाली' या चित्रपटाच्या वेळचा आहे. या चित्रपटाच्या एका दृश्यात कादर खान आणि अरूणा इराणी त्यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर आता आपले इंडस्ट्री काहीही होऊ शकत नाही, असे शक्ती यांना वाटले होते. पण या चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी समजूत घातल्यानंतर शक्ती यांनी हा चित्रपट पूर्ण केला होता.
कादर खानच्या थप्पडमुळे बसला होता धक्का
शक्ती कपूर यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी 'मवाली' चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.
शक्ती कपूर म्हणाले, "मी चित्रपटात माझा पहिला शॉट देत होतो, तेव्हा कादर खान यांनी मला थप्पड मारली आणि मी जमिनीवर पडलो, तर दुसऱ्या शॉटमध्ये अरुणा इराणी यांनी मला थप्पड मारली आणि मी जमिनीवर पडलो, तिसर्यांदाही तसेच झाले. तो सीन करताना माझे करिअर संपले, या विचाराने मी चिंतीत झालो. के. बापैय्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते आणि कादर खान देखील या चित्रपटात एक भूमिका साकारत होते."
"मी कादर खान यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, मी तुमच्या पाया पडतो, पण कृपया माझे तिकीट बुक करा. मला या चित्रपटात काम करायचे नाही. माझे करिअर संपले आहे आणि मी अजून लग्न केलेले नाही," अशी आठवण शक्ती यांनी सांगितली.
वीरू देवगण यांनी केली मदत
शक्ती कपूर पुढे म्हणाले - "या चित्रपटाचे फाइट मास्टर वीरू देवगण यांनी मला बाजुला नेले आणि म्हणाले, मी हा चित्रपट पाहिला आहे आणि जर तुला यात थप्पड खावी लागत असेल तर खा, पण चित्रपट सोडू नकोस. त्यांचा सल्ला खूप फायद्याचा ठरला. कारण ‘मवाली’ चित्रपट सुपरहिट झाला," असे शक्ती यांनी सांगितले. या चित्रपटात शक्ती यांच्यासोबत जितेंद्र, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट त्यावर्षीच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता.
600 चित्रपटांमध्ये केले काम
शक्ती कपूर यांनी आपल्या अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग ती खलनायकाची भूमिका असो किंवा कॉमेडियनची, शक्ती यांनी प्रत्येक पात्र उत्तमरित्या साकारले आहे. वयाची 70 वर्षे ओलांडलेल्या शक्ती यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'राजा बाबू'साठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.