आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेव्ह पार्टी:शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतची बंगळुरूत रेव्ह पार्टी; ड्रग्ज घेताना अटक

बंगळुरू21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतला बंगळुरू पोलिसांनी अमली पदार्थविरोधी प्रकरणात अटक केली. सिद्धांतला शहरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत मादक पदार्थ घेण्याच्या आरोपाखाली अन्य चौघांसह अटक केली. सिद्धांतने अमली पदार्थाचे सेवन केल्याचा दुजोरा मिळाला आहे. सिद्धांत रविवारी रात्री एमजी रोडवरील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत सहभागी झाला होता. यादरम्यान पोलिसांनी छापा टाकला. पार्टीत सुमारे ३५ जण होते. या वेळी केलेल्या वैद्यकीय चाचणीनंतर पाच जणांनी ड्रग्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. पार्टीतून सात “एक्स्टेसी’च्या गोळ्या, गांजा जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...