आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्कर 2021:सयानी गुप्ताच्या 'शेमलेस'ला मिळाली ऑस्करमध्ये एंट्री, ट्रेलरही झाला रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शेमलेस' शॉर्टफिल्मचा दिग्दर्शक कीथ होम्स आहे.

सयानी गुप्ता आणि हुसेन दलाल यांच्या 'शेमलेस' या शॉर्टफिल्मला ऑस्करमध्ये एंट्री मिळाली आहे. या बातमीने चित्रपटाची संपूर्ण टीम खूप आनंदी आहे. दरम्यान या शॉर्टफिल्मचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून हृतिक रोशन, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर या चित्रपटाचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. हृतिक रोशनने लिहिले, “शर्मलेसचा ट्रेलर सादर करत आहे, सर्वांना शुभेच्छा”.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एंट्री मिळालेल्या या 'शेमलेस' शॉर्टफिल्मचा दिग्दर्शक कीथ होम्स हा असून तो याआधी 'किक', 'हे बेबी', 'टॅक्सी नं. 9211', 'नॉकआउट', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई'सारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे. दरवर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळा फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जातो. मात्र करोनामुळे हा सोहळा दोन महिने पुढे ढकलण्यात आला आहे. 25 एप्रिल 2021 ला हा सोहळा संपन्न होणार आहे.

'शेमलेस' या शॉर्टफिल्ममध्ये सयानी गुप्ता, ऋषभ कपूर आणि हुसेन दलाल या कलाकारांनी काम केले आहे. तर कीथ गोम्सने ही शॉर्टफिल्म लिहिली असून त्यानेच दिग्दर्शित केली आहे. या शॉर्टफिल्मचा कालावधी 15 मिनिटे आहे. पिझ्झाची ऑर्डर घरपोच द्यायला गेलेली मुलगी आणि घरातून काम करणाऱ्या प्रोफेशनल्सच्या जीवनावर आधारित शॉर्टफिल्मची कथा आहे. कशाप्रकारे टेक्नॉलॉजीने लोकांना चुकीच्या पद्धतीने बदलून टाकले आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.