आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Trending On Twitter #ShameOnAkshayKumar, Film Accused Of Promoting Love#ShameOnAkshayKumar Trends On Twitter, Twitter Users Protesting Against Hindu Muslim Issue In Laxmi Bomb jihad

तनिष्कनंतर आता 'लक्ष्मी बॉम्ब'चा निषेध:ट्विटरवर ट्रेंड झाले #ShameOnAkshayKumar, चित्रपटावर लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटात हिंदू-मुस्लिम तरुणांचं प्रेमप्रकरण दाखवून लव्ह जिहादचा प्रचार केला जातोय अशी टीका काही प्रेक्षक करत आहेत.

तनिष्क या ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीनंतर आता अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटावर लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला जात आहे. शुक्रवारी अक्षयच्या विरोधात #ShameOnAkshayKumar ट्विटरवर ट्रेंड झाले. राघव लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयच्या पात्राचे नाव आसिफ असून त्याचे प्रिया (कियारा अडवाणी) या हिंदू मुलीशी लग्न झाले आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला आहे, असे काहींचे मत आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी काही प्रेक्षक करत आहेत.

टीकाकारांनी काय म्हटले ?
सुप्रीम कोर्टात प्रक्टिस करणारे वकील प्रशांत पटेल उमराव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "शबीना खान 'काश्मिरी फुटीरतावादी 'लक्ष्मी बॉम्ब 'ची निर्माती आहे. आसिफ (अक्षय) च्या अंगात लाल रंगाची साडी परिधान करणार्‍या ट्रान्सजेंडर लक्ष्मीचे भूत येते. अधिकृत टीझरच्या पार्श्वभूमीवर माता लक्ष्मीला दाखवले. अक्षय कुमारचा धिक्कार असो.'

एका ट्विटर यूजरने लिहिले, "अक्षय कुमार देखील बॉलिवूडच्या जोकरांपैकी एक आहे, असे माझे मत आहे. मला वाटत होते की तो इतरांपेक्षा वेगळा आहे. मात्र आता लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. कृपया #BoycottLaxmiBomb, #ShaneOnAkshayKumar रिट्विट करा."

एका यूजरने म्हटले "लोक त्याला देशभक्त का म्हणतात मला माहित नाही?"

एका ट्विटर युजरने लिहिले, "लक्ष्मी बॉम्बचे नाव 'सलमा बॉम्ब' ठेवता येईल का? नकली देशभक्त अक्षय कुमार."

9 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होतोय

9 ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला होता. हा चित्रपट कांचना या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यापूर्वी 22 मे 2020 रोजी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता हा चित्रपट 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...