आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशमिता शेट्टी आणि राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघांचे ब्रेकअप झाले आहे. याआधीही अनेकदा त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या आल्या, मात्र या दोघांनी नेहमीच या अफवांचे खंडन केले. पण आता दोघांचे मार्ग वेगळे झाले असून त्यांनी परस्पर संमतीने आता केवळ मैत्री टिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
शमिता-राकेश वेगळे झाले
फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, शमिता आणि राकेश यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या कपलच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला की, "शमिता शेट्टी आणि राकेश बापट वेगळे झाले आहेत. ते नेहमीच एकमेकांबद्दल आदर बाळगतील आणि भविष्यातही ते मित्र राहतील. आम्ही एका म्युझिक व्हिडिओचे शूटिंग पूर्ण केले आहे जो लवकरच रिलीज होईल. चाहत्यांना या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळेल."
याआधीही ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या.
शमिता आणि राकेशच्या ब्रेकअपच्या बातम्या खूप दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र दोघांनीही या सर्व अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. शमिता म्हणाली होती, "माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आमच्या नात्याबद्दलच्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. या सगळ्यात तथ्य नाही."
'बिग बॉस ओटीटी'मध्ये झाली होती दोघांची पहिली भेट
शमिता आणि राकेश सह-स्पर्धक म्हणून 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाले होते, त्यानंतर त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. या शोमध्ये दोघे अनेकदा एकमेकांशी भांडतानाही दिसले. यादरम्यान शमिताने खुलासा केला होता की तिच्या प्रियकराचे वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षीच निधन झाले होते, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. तर वडिलांचे निधन आणि रिद्धी डोगरापासून घटस्फोट या सगळ्यांतून बाहेर पडणे माझ्यासाठी खूप कठीण होते, असा खुलासा राकेश बापटने या शोमध्ये केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.