आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्न फिल्म केस:राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पासाठी शमिताची भावूक पोस्ट, म्हणाली - 'हा कठीण काळसुद्धा जाईल, विश्वास ठेव'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा शेट्टीच्या या कठीण परिस्थितीमध्ये तिची धाकटी बहीण शमिता शेट्टी तिच्यासोबत आहे.

पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि अॅपवर ते स्ट्रीम केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रा सध्या अटकेत आहे. त्याच्या अडचणी सध्या तरी कमी होताना दिसत नाहीयेत. दरम्यान 23 जुलै रोजी शिल्पाचा कमबॅक चित्रपट हंगामा 2 रिलीज झाला आहे.

23 जुलै रोजी शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांना हा चित्रपट बघण्याची अपील केली होती. शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'हंगामा 2 या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. संपूर्ण वादाचा या चित्रपटावर परिणाम व्हायला नको. आपण सगळ्यांनी हंगामा 2 बघावा अशी माझी इच्छा आहे.'

शमिता म्हणाली - हा कठीण काळसुद्धा जाईल
शिल्पा शेट्टीच्या या कठीण परिस्थितीमध्ये तिची धाकटी बहीण शमिता शेट्टी तिच्यासोबत आहे. शिल्पाला धीर देण्यासाठी शमिताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टसोबत शिल्पाच्या 'हंगामा 2' या चित्रपटाचे पोस्टरही तिने शेअर केले आहे. शमिताने लिहिले, 'हंगामा 2 साठी खूप साऱ्या शुभेच्छा मुनकी... मला माहिती आहे या चित्रपटासाठी तू खूप मेहनत घेतली होतीस. तुझ्यासोबत या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. तुला खूप सारे प्रेम आणि मी तुझ्यासोबत कायम आहे. तू आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेस. या सगळ्या अनुभवांमुळे तू खूप कणखर झाली आहेस. हा कठीण काळसुद्धा जाईल, विश्वास ठेव. हंगामा 2 च्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट.'

शमिताला काम देणार होता राज कुंद्रा
राज कुंद्राच्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करणारी गहना वशिष्ठ हिने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, राज कुंद्रा बॉलिफेम नावाचे एक नवीन अॅप लाँच करण्याची तयारी करत होता. आणि त्यात त्याची मेहुणी शमिता शेट्टीला काम देणार होता.

गहनाने एका मुलाखतीत सांगितले, 'राजच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला गेले होते. तेथे मला कळले की तो बॉलिफेम नावाचे एक नवीन अ‍ॅप लाँच करण्याची तयारी करत आहे. या अ‍ॅपवर त्याचा चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ, फीचर फिल्म दाखवण्याचा विचार होता. या अ‍ॅपच्या कंटेंटवर बोल्ड सीन्ससाठी त्याची कोणतीही प्लानिंग नव्हती. मी आणि राज यांनी काही स्क्रिप्टवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान आम्ही शमिता शेट्टीला स्क्रिप्टमध्ये कास्ट करण्याचा विचार केला. सई ताम्हणकर आणि इतर काही कलाकारांची नावेही विचारात घेण्यात आली. मी या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होते आणि याच दरम्यान राजला अटक करण्यात आली.'

गहनाने पुढे सांगितल्यानुसार, माझे काम फक्त हे चित्रपट दिग्दर्शित करण्यापूरते होते. चित्रपटासाठी शमिता किती पैसे घेणार होती आणि तिच्या काय अटी होत्या, याबद्दल मला काही माहित नव्हते शमिताने उमेश कामतशी यावर चर्चा केली होती आणि यासाठी तिने होकार दिला होता, असे गहनाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...