आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टळला:आता एकाच दिवशी रिलीज होणार नाहीत 'शमशेरा' आणि '83', 'शमशेरा'च्या दोन आठवड्यांपूर्वी रिलीज होणार '83'

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • '83' हा चित्रपट 'शमशेरा'च्या रिलीजच्या दोन आठवड्यांपूर्वी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

यशराज फिल्म्सने नुकतीच आपल्या पाच मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. ते यावर्षी रिलीज होतील. यशराजच्या वतीने सांगण्यात आले की, यशराज फिल्म्सने 2021 साठी चित्रपट लॉक केले आहेत. आणि आता कंपनी पुन्हा प्रेक्षकांना मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पाहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे. या पाच चित्रपटांमध्ये 'संदीप और पिंकी फरार', 'बंटी और बबली 2', 'शमशेरा', 'जयेशभाई जोरदार' आणि पृथ्वीराज' या चित्रपटांचा समावेश आहे.

दरम्यान 25 जून रोजी यशराज फिल्म्स 'शमशेरा' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याच दिवशी रणवीर सिंह स्टारर '83' हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र आता 'शमशेरा' आणि '83' यांचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष टळणार आहे. कारण डिस्ट्रीब्यूटिंग कंपनी रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सूत्रांनुसार, '83' हा चित्रपट 'शमशेरा'च्या रिलीजच्या दोन आठवड्यांपूर्वी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. '83' हा चित्रपट आता 25 जून ऐवजी 11 जून रोजी रिलीजो होणार आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दिवाळीत होणार अक्षय-शाहिदच्या चित्रपटांची टक्कर
'शमशेरा' आणि '83' या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरील संघर्ष टळला असला तरी अभिनेता अक्षय कुमार आणि शाहिद कपूरचे चित्रपट मात्र समोरासमोर येणार आहेत. अक्षयचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी शाहिद कपूर स्टारर 'जर्सी' हा चित्रपटदेखील रिलीज होतोय. त्यामुळे यंदा दिवाळीत अक्षय आणि शाहिदच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर बघायला मिळेल.

यशराजचे 5 मोठे चित्रपट
ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना यशराज फिल्म्सने त्यांचे 5 मोठे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. यशराजने सोशल मीडियावर 2021 मध्ये प्रदर्शित होणा-या चित्रपटांची यादी शेअर केली आहे.

  • पहिला चित्रपट 'संदीप और पिंकी फरार' हा आहे. हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. दिबाकर बॅनर्जी हे दिग्दर्शक आहेत.
  • दुसरा चित्रपट 'बंटी और बबली 2' हा आहे. हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी रिलीज होईल. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. तर शरवरी ही या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण व्ही शर्मा आहेत.
  • तिसरा चित्रपट म्हणजे 'शमशेरा'. हा चित्रपट 25 जून रोजी रिलीज होईल. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त हे मुख्य भूमिकेच आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे.
  • चौथा चित्रपट 'जयेशभाई जोरदार' हा आहे. तो 27 ऑगस्ट रोजी रिलीज होईल. या चित्रपटात रणवीर सिंग, शालिनी पांडे, बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिव्यांग ठक्कर हे याचे दिग्दर्शक आहेत.
  • पाचवा चित्रपट 'पृथ्वीराज'. हा चित्रपट 5 नोव्हेंबरला रिलीज होईल. अक्षय कुमार, सोनू सूद, संजय दत्त आणि मानुषी छिल्लर यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी हे आहेत.
बातम्या आणखी आहेत...