आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sharad Kelkar Remembered The Days Of His Struggle, Said– At That Time I Did Not Have Balance In The Bank, As Well As There Was No Money In The Credit Card

आपबिती:अभिनेता शरद केळकरने दिला संघर्षाच्या दिवसांना उजाळा, म्हणाला - त्यावेळी माझ्याकडे बँकेत पैसे शिल्लक नव्हते, क्रेडिट कार्डही बंद झाले होते

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरदने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले

अभिनेता मनीष पॉलच्या पॉडकास्ट या टॉक शोमध्ये शरद केळकरने त्याच्या संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला. शरदने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा त्याच्या बँक खात्यात पैसे नव्हते, डोक्यावर खूप कर्ज होते. इतकेच नाही तर क्रेडिट कार्डही बंद झाले होते. मनीषने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शोच्या आगामी भागाचा टीझर शेअर केला आहे.

शरदने संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले
शरद व्हिडिओमध्ये म्हणतो, 'लोक विचार करतात की यांच्याकडे मर्सिडीज आहे. चांगले कपडे घालता, चांगली हेअर स्टाइल करून फिरतात. मात्र लोकांना यामागची स्टोरी माहित नसते. लोकांना आधीच्या संघर्षाबद्दल कल्पना नसते,' असे शरद म्हणाला.

शरदला वाईट काळ आठवला

शरदने पुढे सांगितले, "त्यावेळी माझे क्रेडिट कार्ड बंद झाले होते. एक वेळ अशी आली होती की, बँक खात्यात काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. मला कर्जाची परतफेड करायची होती आणि क्रेडिट कार्डमध्ये देखील पैसे शिल्लक राहिले नव्हते."

'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये दिसणार शरद

शरदने 'सात फेरे: सलोनी का सफर', 'कुछ तो लोग कहेंगे' आणि 'एजंट राघव - क्राइम ब्रँच' सारख्या शोमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'भूमी' आणि 'लक्ष्मी' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. आता तो 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तो भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेही आहेत. हा चित्रपट 13 ऑगस्टला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. शरद अलीकडेच 'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...