आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फॅशन इंडस्ट्रीतून वाईट बातमी:प्रसिद्ध फॅशन डिझायनर शरबरी दत्ता बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या, मुलाने एक दिवसापूर्वी आईला अखेरचे बघितले होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरबरी दत्ता यांनी सचिन तेंडुलकर आणि इम्रान खानसारख्या सेलेब्रिटींचे ड्रेस डिझाइन केले होते.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री 12:25 वाजता दक्षिण कोलकाता येथील बोर्ड स्ट्रीट येथील राहत्या घरी बाथरुममध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांना कोणताही आजार नसल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

  • बुधवारी मुलाने अखेरचे पाहिले होते

शरबरी दत्ता यांचा मुलगा अमलिन हा देखील एक फॅशन डिझायनर आहे. त्याने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "बुधवारी मी माझ्या आईला शेवटच्या वेळी पाहिले. गुरुवारी, दिवसभर ती मला दिसली नाही. मला वाटलं की ती व्यस्त असेल आणि काही कामानिमित्त बाहेर गेली असावी. हे आमच्यासाठी काही नवीन नव्हते. कारण आम्ही दोघेही आमच्या कामात खूप व्यस्त असायचो, त्यामुळे दररोज आमची भेट होत नसायची."

  • बंगाली कवी अजित दत्ता यांच्या कन्या होत्या शरबरी

शरबरी दत्ता या प्रसिद्ध बंगाली कवी अजित दत्ता यांच्या कन्या होत्या. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले होते आणि कोलकाता विद्यापीठातून मास्टर डिग्री घेतली होती. महाविद्यालयीन जीवनाक त्या डान्स ड्रामात सहभागी व्हायच्या. त्यानंतर फॅशन इंडस्ट्रीत त्या लोकप्रिय झाल्या.

  • सचिन, इम्रान यांचे केले होते ड्रेस डिझाईन

शरबरी विशेषत: मेल सेलिब्रिटींचे कपडे डिझाइन करायच्या. क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह अनेक प्रसिद्ध लोकांसाठी त्यांनी ड्रेस डिझाइन केले होते. मेनस्ट्रीम फॅशन वर्ल्डमध्ये त्यांनी रंगीत बंगाली धोती आणि भरतकाम केलेले पंजाबी कुर्ते इंट्रोड्युस केले होते.