आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:अभिनेता शरमन जोशीला पितृशोक, ज्येष्ठ नाट्य अभिनेते अरविंद जोशींनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेम चोप्रांचे व्याही होते अरविंद जोशी

अभिनेता शरमन जोशीचे वडील आणि ज्येष्ठ नाट्य अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे 29 जानेवारी रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद जोशी यांना गुजराती नाट्य अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. अरविंद यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले (मुलगा शरमन आणि मुलगी मानसी जोशी रॉय) आहेत.

प्रेम चोप्रांचे व्याही होते अरविंद जोशी
अरविंद हे प्रेम चोप्रा यांचे व्याही होते. त्यांचा मुलगा शरमनचे लग्न प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्राशी झाले आहे. तर मुलगी मानसीने टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता रोहित रॉयशी लग्न केले आहे. रोहित हा अभिनेता रोनीत रॉयचा भाऊ आहे. अरविंद हे प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री सरिता जोशी यांचे दीर होते आणि अभिनेत्री केतकी दवे आणि पूरब जोशी यांचे काका होते.

बॉलिवूड चित्रपटांसाठी देखील केले होते काम

गुजराती थिएटर व्यतिरिक्त अरविंद यांनी बॉलिवूडमधील काही चित्रपटांसाठी काम केले होते. यामध्ये 1975 मध्ये आलेल्या धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन स्टारर सुपरहिट फिल्म 'शोले' चा समावेश आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात अरविंद यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

1969 मध्ये अरविंद यांनी यश चोप्रा यांना राजेश खन्ना आणि नंदा स्टारर 'इत्तेफाक' मध्ये असिस्ट केले होते. याशिवाय त्यांनी 1990 च्या 'अपमान की आग' मध्ये इंस्पेक्टर प्रभाकरची भूमिका साकारली होती, हा चित्रपट सरदार तालुकर यांनी दिग्दर्शित केला होता.

बातम्या आणखी आहेत...