आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्मिलाची शाळेतून झाली होती हकालपट्टी:सासूच्या भीतीने मुंबईतून काढले होते बोल्ड पोस्टर्स, नवाब पतौडीकडे लग्नासाठी ठेवली होती खास अट

इफत कुरेशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शर्मिला टागोर... हे त्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रीचे नाव आहे, ज्या त्यांच्या काळाच्या खूप पुढे होत्या. ज्या काळात बहुतेक अभिनेत्री साड्यांमध्ये दिसायच्या त्या काळात त्यांनी मोठ्या पडद्यावर बिकिनी परिधान करण्याचे धाडस केले होते. शर्मिला टागोर यांचा आज 78 वा वाढदिवस आहे. त्यांचे फिल्मी करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य, त्या नेहमीच चर्चेत राहिल्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील शर्मिला टागोर यांनी वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

त्यांनी धर्म बदलून नवाब पतौडी यांना आपला जोडीदार बनवले आणि स्वतःचे नाव बेगम आयेशा सुलताना ठेवले. नवाबांच्या कुटुंबात सामील झाल्यानंतरही त्यांच्या धाडसीपणाची चर्चा होती. भारतीय आणि परदेशी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अध्यक्षा राहिल्या. शिवाय युनिसेफच्या गुडविल अॅम्बेसेडर आणि कान फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी सदस्यही त्या होत्या.

शर्मिला टागोर यांच्या वाढदिवसानिमित्त खास 8 फोटोंमधून जाणून घ्या शर्मिला टागोर यांची कहाणी...

शर्मिला टागोर यांचा जन्म 8 डिसेंबर 1944 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. त्यांचे वडील गितिंद्रनाथ ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशनमध्ये महाव्यवस्थापक होते. त्या कानपूरच्या सर्वात प्रतिष्ठित टागोर कुटुंबातून होत्या. ज्या कुटुंबातून नोबल रवींद्रनाथ टागोर, चित्रकार गगनेंद्रनाथ टागोर, अबनिंदरनाथ टागोर, अभिनेत्री आणि भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली महिला देविका राणी येतात.

तीन बहिणींमध्ये त्या सर्वात मोठ्या आहेत. त्यांची धाकटी बहीण ओएंड्रिला चित्रपटांत काम करणारी टागोर घराण्यातील पहिली मुलगी होती. तिने तपन सिन्हा यांच्या काबुलीवाला (1957) मध्ये अभिनय केला होता. तर त्यांची दुसरी बहीण रोमिला हिचे लग्न ब्रिटानियाचे अधिकारी आणि उद्योगपती निखिल सेन यांच्याशी झाले होते.

सेंट डॉन डिओसेन स्कूलमध्ये शिकत असताना शर्मिला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि खेळाची आवड होती. लहानपणी एका कार्यक्रमादरम्यान शर्मिला यांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कोटवर गुलाब लावण्याची संधी मिळाली होती.

एके दिवशी चित्रपट निर्माते सत्यजित रे शर्मिला टागोर यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी शर्मिला यांच्या वडिलांना सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलीला चित्रपटात कास्ट करायचे आहे. कदाचित ते शर्मिला यांना शाळेतून फॉलो करत त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी चांगल्या कुटुंबातील मुलींचे अभिनयात जाणे अवघड होते, पण वडिलांनी पटकन होकार दिला. शर्मिला यांनी वयाच्या 13 व्या वर्षी सत्यजित रे यांच्या 'अपूर संसार' (1959) बंगाली चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी या चित्रपटासाठी चित्रीकरण केले, परंतु त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावर आक्षेप घेतला. 13 वर्षांच्या शर्मिला यांच्या अभिनयाने सत्यजित इतके प्रभावित झाले की, त्यांनी शर्मिला यांना 'देवी' चित्रपटातही कास्ट केले.

सतत चित्रपटांमध्ये काम करत असताना शर्मिला यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता. शूटिंगमध्ये बिझी असल्याने त्यांनी शाळेत जाणे बंद केले. एक वेळ अशी आली जेव्हा शर्मिला यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना शाळा सोडण्यास सांगितले, कारण त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा इतर विद्यार्थ्यांवर परिणाम होतोय, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. त्याकाळात चित्रपटांमध्ये काम करणे वाईट मानले जायचे. त्यांनी बंगाली शाळा सोडली आणि एनासोल लोरेटोमध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते.

शर्मिला जेव्हा मुंबईच्या कॉलेजमध्ये दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यांना शिक्षण किंवा अभिनय यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले. शर्मिलाचे त्यांच्याशी खूप भांडण झाले, एकदिवस खूप मोठी होऊन दाखवले, असे शर्मिला यांनी प्राचार्यांना म्हटले. शर्मिला यांनी त्यांची पुस्तके त्यांच्यासमोर फेकली आणि त्या कॉलेजमधून निघून गेल्या.

6 बंगाली चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर शर्मिला यांनी 'काश्मीर की कली' (1964) या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. शर्मिला शम्मी कपूर यांच्या अपोझिट चंपा या भूमिकेत खूप गाजल्या होत्या. त्यावेळी त्यांना 'वक्त' (1965), 'डाकघर' (1965), 'अनुपमा' (1966), 'देवर' (1966), 'सावन की घटा' (1966), 'ये रात फिर ना या आएगी' सारखे सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळाले.

बिकिनी परिधान करणारी पहिल्या अभिनेत्री, वादात अडकल्या
फिल्मफेअर मासिकाच्या कव्हर पेजसाठी 1966 च्या फोटोशूटमध्ये शर्मिला टागोर यांनी ब्लॅक अँड व्हाइट बिकिनीमध्ये पोज दिली होती. बिकिनीमध्ये पोज देणा-या त्या भारतातील पहिल्या अभिनेत्री ठरल्या.

त्यानंतर लगेचच, 1967 मध्ये रिलीज झालेल्या 'अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस' या चित्रपटात त्यांनी एका गाण्यात बिकिनी घातली होती. पडद्यावर बिकिनीमध्ये झळकलेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. यानंतर त्यांना सेक्स सिम्बॉल म्हटले जाऊ लागले. लोकांनी त्यांच्यावर अश्लीलता पसरवण्याचा आणि भारतीय सभ्यता बिघडवल्याचा आरोप केला. शर्मिला यांच्या बिकिनी लूकवर संसदेतही टीका झाली होती, पण बिकिनी घालण्याबद्दल त्यांना कधीच संकोच वाटला नव्हता.

मन्सूर 1965 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार असताना शर्मिला त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. मन्सूर आणि शर्मिला यांची पहिली भेट एका आफ्टर मॅच पार्टीत झाली होती. नवाब यांना शर्मिला आवडल्या म्हणून त्यांनी शर्मिला यांना इम्प्रेस करण्यासाठी 8 फ्रिज भेट म्हणून पाठवले. यानंतरही शर्मिला राजी झाल्या नाही. एकदा मन्सूर अली खान यांनी द्विशतक झळकावले तेव्हा शर्मिला यांनी मित्रांसमोर शो ऑफ करण्यासाठी त्यांना मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या. अशाच एका भेटीतून दोघांची मैत्री सुरू झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. एकदा नवाब पतौडी परदेश दौर्‍यावर जात असताना शर्मिला पनवेलमध्ये 'अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस' या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. शर्मिला शूटिंगच्या मध्येच नवाब यांना ड्रॉप करण्यासाठी विमानतळावर गेल्या. बोलण्या बोलण्यात मन्सूर यांनी त्यांना विचारले की, जर तुमचा काही प्लान नसेल तर माझ्यासोबत येणार का? शर्मिला काहीही विचार न करता हो म्हणाल्या. पण त्यावेळी त्यांच्याकडे ना कपडे होते ना काही सामान, उलट त्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन विमानतळावर पोहोचल्या होत्या. जेव्हा दोघे एकत्र आले, तेव्हा मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये त्याची खूप चर्चा झाली. शर्मिला यांनी हो म्हणताच मन्सूर यांना सर्वप्रथम आपल्या आईला याची माहिती दिली होती.

'अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस' हा चित्रपट रिलीज होणार होता. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई शहरात चित्रपटाचे अनेक पोस्टर्स लावण्यात आले होते. अनेक पोस्टर्समध्ये शर्मिला बिकिनीमध्ये दिसत होत्या. त्याचवेळी नवाब पतौडी यांच्या आई साजिदा बेगम त्यांना भेटण्यासाठी मुंबईत येणार होत्या. साजिदा त्या वेळी भोपाळच्या बेगम होत्या. त्यांच्या येण्याची बातमी शर्मिलाला मिळताच त्या घाबरल्या. त्यांनी आधी निर्मात्याला फोन करून लगेच चित्रपटाचे सर्व पोस्टर्स काढण्याची विनंती केली. निर्मात्यांनी सहमती दर्शविली आणि काही दिवसांसाठी 'अॅन इव्हिनिंग इन पॅरिस' या चित्रपटाचे पोस्टर्स शहरातून काढून टाकण्यात आले.

अनेक वर्षांनंतर फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी सांगितले, ही माझ्या लग्नापूर्वीची गोष्ट आहे. मला आठवतंय जेव्हा मी माझ्या टू-पीस बिकिनीचा फोटो नवाब साहेबांना दाखवला तेव्हा त्यांनी मला विचारले की, मी यात कम्फर्टेबल आहे का? काही शॉट्समध्ये, त्यांनी मला स्वतःला झाकण्यास सांगितले. ते माझ्यापेक्षा जास्त काळजीत होते कारण मला त्या शूटमध्ये कोणताही संकोच वाटला नव्हता. लोक जेव्हा त्यावर वाईट प्रतिक्रिया देऊ लागले तेव्हा मला धक्का बसला. लोकांना ती छायाचित्रे का आवडली नाहीत हे मला समजले नाही, कारण मला ती छायाचित्रे खूप आवडली होती. मी लहान होते आणि मला नवीन गोष्टी करण्यात खूप रस होता. मी स्वतः ते फोटोशूट सुचवले होते.

चार वर्षांनी प्रपोजला उत्तर देण्यासाठी ठेवली होती विशेष अट
मन्सूर अली खान यांनी शर्मिला टागोरला यांना पॅरिसमध्ये लग्नासाठी प्रपोज केले होते. या प्रपोजला उत्तर देण्याऐवजी शर्मिला यांनी त्यांच्यासमोर एक अट घातली की, मन्सूर यांनी जर सामन्यात 3 षटकार लगावले तरच त्या त्यांच्याशी लग्न करतील. मन्सूर यांनी पुढच्याच सामन्यात षटकारांची हॅट्ट्रिक करुन शर्मिलाचा लग्नासाठी होकार मिळवला होता. 27 डिसेंबर 1968 रोजी दोघांनी लग्न केले. लग्नासाठी शर्मिला यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव बेगम आयशा पतौडी ठेवले.

मन्सूर यांच्या खराब कामगिरीबद्दल शर्मिला टागोर यांना वडील रागवायचे
दिया जैस्वाल यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान शर्मिला टागोर यांनी सांगितले होते की, मन्सूर अली खान जेव्हाही एखादा झेल सोडायचे, तेव्हा त्यांचे वडील त्यांच्या खराब कामगिरीसाठी त्यांना दोष देत असत. शर्मिला त्यांना रात्रभर का जागवते असे ते म्हणायचे.

हा तो काळ होता जेव्हा बिना राय, डिंपल कपाडिया, नीतू सिंग, बबिता यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. पण शर्मिला यांनी लग्न आणि आई होऊनही चित्रपटांमध्ये काम सुरू ठेवले. लग्नानंतरही त्यांनी आराधना, अमर प्रेम, आ गले लग जा, मौसम, चुपके चुपके यांसारखे कारकिर्दीतील सर्वात मोठे हिट चित्रपट दिले.

यावर शर्मिला म्हणाल्या होत्या, मी लग्नानंतर काहीही सोडले नाही. मन्सूर खूप उदारमतवादी आहे. मी एक नवीन संस्कृती शिकले आणि त्यांच्याबरोबर नवीन अनुभव घेतले.

शर्मिला टागोर यांना सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान ही तीन मुले आहेत. सैफ आणि सोहा यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले, तर सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे. शर्मिला टागोर आपल्या सर्व मालमत्तेची जबाबदारी स्वत: सांभाळत असल्या तरी भोपाळच्या पतौडी हाऊस आणि 2700 कोटींच्या इतर मालमत्तेची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या मुलाऐवजी मुलगी सबाकडे सोपवली आहे.

शर्मिला टागोर यांच्याकडे आहे 5 हजार कोटींची मालमत्ता

शर्मिला टागोर यांची एकूण संपत्ती 5 हजार कोटींच्या आसपास आहे. गुरुग्रामपासून 25 किमी अंतरावर असलेल्या पतौडी पॅलेसची किंमत 800 कोटी आहे. याशिवाय पतौडी कुटुंबाकडे भोपाळमध्ये 2700 कोटींची संपत्ती आहे, ज्यामध्ये अनेक राजवाडे, कब्रस्तान, मशीद, दर्गा आणि सरकारी कार्यालयांची जमीन आहे. पतौडी पॅलेसमध्ये वीर-जारा, रंग दे बसंती आणि तांडव सिरीजसह अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. भाड्याची संपूर्ण रक्कम शर्मिला टागोर यांच्याकडे जाते.

बातम्या आणखी आहेत...