आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामन्सूर अली खान यांचा 22 सप्टेंबर रोजी 10 व्या स्मृतीदिन होता. यानिमित्ताने त्यांच्या पत्नी शर्मिला टागोर आणि मुलगी सोहा अली खान यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मन्सूर अली यांची कबर पतौडी हवेलीत असून तिथे जाऊन त्यांनी टायगर यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी सोहाची मुलगी सबादेखील त्यांच्यासोबत दिसली. हे फोटो सोहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
2011 मध्ये झाले होते टायगर पतौडी यांचे निधन
सोहाने हे फोटो शेअर करताना एक भावूक नोट लिहिली आहे. तिने लिहिले आहे, 'तुम्ही आमच्यातून कधीच जाऊ शकत नाही. तुम्हाला विसरणे कधीच शक्य नाही.'
सोहाबरोबरच सबा अली खान हिने देखील तिच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक व्हिडिओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. सोहाने व्हिडिओ शेअर करताना एक पोस्ट लिहिली आहे. सोहाने लिहिले, 'अब्बा, मला दररोज तुमची आठवण येते. मला माहिती आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मला बघत आहात. तुम्हाला जाऊन दहा वर्ष झाली असे वाटते ही नाही. तुम्ही कायम आमच्या मनात, हृदयात असणार आहात..तुमच्यावर कायम प्रेम करत राहू...'
शर्मिला यांनी बॉलिवूड पदार्पणानंतर 5 वर्षांनी केले होते लग्न
शर्मिला टागोर यांनी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी 1969 मध्ये लग्न केले होते. 1970 मध्ये त्यांचा मुलगा सैफ अली खान, 1976 मध्ये मुलगी सबा आणि 1978 मध्ये सोहा अली खान यांना जन्म झाला. मन्सूर अली खान पतौडी यांचे 2011 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज देताना निधन झाले. शर्मिला टागोर यांना सत्यजित रे यांनी 1959 मध्ये आलेल्या अपूर संसार या बंगाली चित्रपटातून लाँच केले होते. शर्मिला यांनी 1964 मध्ये कश्मीर की कली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी आराधना, चुपके चुपके, अमर प्रेम यासारख्या अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.