आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच अरबाज खानचा चॅट शो 'द इनविजिबल्स विथ अरबाज'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी शत्रुघ्न यांनी सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरील खुणंमुळे खूप असुरक्षित वाटायची. त्यामुळे त्यांनी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्याचा विचार केला होता. पण त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले आणि चेहऱ्यावरील खुणा तुला इतरांपेक्षा वेगळे बनवतात असे सांगितले. देव आनंद यांनी समजूत घातल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्लास्टिक सर्जरीचा निर्णय बदलला होता.
शत्रुघ्न यांनी शेअर केला बालपणीचा किस्सा
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले, 'लहानपणी मी माझ्या मामाची नक्कल करत दाढी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. मी आधी माझ्या चुलत भावाचा गाल रेझरने कापला आणि नंतर माझा गाल कापला. त्यादरम्यान माझ्या कुटुंबीयांनी घरी प्राथमिक उपचार केले, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. चेहऱ्यावरील व्रण तसेच राहिले.'
शत्रुघ्न पुढे म्हणाले, 'जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी ते व्रण दूर करण्यासाठी प्लास्टिक सर्जनशीही बोललो होतो.'
देव आनंद यांनी प्लास्टिक सर्जरी न करण्याचा सल्ला दिला
शत्रुघ्न पुढे म्हणाले, 'ज्या काळात मी स्ट्रगलर होतो, तेव्हा मी देव आनंद यांना खूप भेटायचो. त्यांनी मला चेहऱ्यावरील खुणा तशाच ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी प्लास्टिक सर्जरी करु नको, असे सांगितले. सोबतच माझ्या दातांमध्येही अंतर आहे आणि ती आता फॅशन झाली आहे, असे ते म्हणाले. खरं तर मला चेहऱ्यावरील चट्ट्याची लाज वाटायची. मला चिंता होती की, मी चित्रपटात अशा चेहऱ्याने आलो तर माझे स्थान कसे निर्माण होईल?,' असे त्यांनी सांगितले.
करिअरच्या सुरुवातीला शत्रुघ्न यांनी अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या. यानंतर त्यांना खलनायकाच्या भूमिकाही मिळू लागल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपले खास स्थान निर्माण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.