आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:पीएम केयर्स फंडात अक्षयच्या योगदानाबद्दल शत्रुघ्न यांचा उपरोधिक टोला, विवेक म्हणाले- वाढत्या वयामुळे लोक असे वागतात 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी शत्रुघ्न यांचे विधान अनावश्यक असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाव्हायरस विरूद्धच्या लढ्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने पीएम केयर्स फंडात 25 कोटी रुपयांची मदत केली आहे. यावरुन अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत अक्षय कुमारच्या नावाचा उल्लेख न करता अप्रत्यक्षरित्या त्याला सुनावले आहे. ते म्हणाले की,  ‘आपण केलेल्या मदतीची घोषणा करणे हे फार चुकीचे आहे. कोणी 25 कोटी रुयांची मदत केली हे ऐकून खराब वाटते.’ दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी शत्रुघ्न यांचे विधान अनावश्यक असल्याचे म्हटले आहे.

  • वाढत्या वयामुळे लोक असे वागतात : विवेक

'द ताशकंद फाइल्स' सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी शत्रुघ्न यांना लक्ष्य केले आहे. ते एका बातचीतमध्ये म्हणाले, "लोक वयानुसार असे वागू लागतात. त्यांना लोकांसोबत एकत्र येऊन सेलिब्रेट करणे आवडत नाही. अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जाणून घेणे की लोक इतरांना मदत करत आहेत. लोक त्यामुळे प्रेरणा घेतील. दुसरे म्हणजे ती देणगी नव्हे तर ते सहकार्य आहे. हे आपत्ती व्यवस्थापन आहे. वृद्ध लोक नेहमीच व्यत्यय आणत राहतात. हे योग्य नाही, ते योग्य नाही, असे म्हणत असतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊन आपली ऊर्जा वाया घालवू नये."

  • शत्रुघ्न काय म्हणाले होते

नुकत्याच एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी पैशाची मदत केल्यानंतर सोशल मीडियाद्वारे त्याची माहिती देणाऱ्यांना सुनावले होते. त्यांनी अप्रत्यक्षपणे अक्षय कुमारला उपरोधिक टोला लगावला होता. अक्षयचे नाव न घेता ते म्हणाले, ‘आपण केलेल्या मदतीची घोषणा करणे हे फार चुकीचे आहे. कोणी 25 कोटी रुयांची मदत केली हे ऐकून खराब वाटते. सध्याच्या परिस्थितीची कोणाला किती जाणीव आहे हे लोक त्याने केलेल्या मदतीवरुन ठरवतात. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात कलाकाराने मदत केल्यानंतर त्याचा दिखावा करणे चुकीचे आहे. कारण ती एक खासगी गोष्ट आहे.’ 

  • अक्षयने सर्वप्रथम दिले योगदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मार्च रोजी पीएम केअर फंडाची घोषणा केली आणि देशवासियांना त्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर लगेचच अक्षय कुमारने 25 कोटी रुपयांच्या योगदानाची घोषणा केली आणि असे करणारा तो बॉलिवूडचा पहिला सेलिब्रिटी ठरला. अक्षयने ट्विटरवर लिहिले होते, "याक्षणी आपल्या लोकांचे जिवंत राहणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला काहीही आणि सर्व काही करण्याची गरज आहे. नरेंद्र मोदींच्या पीएम केअर फंडला माझ्या बचतीतून 25 कोटी रुपये देण्याचा मी संकल्प करतो. चला जीव वाचवूया."

बातम्या आणखी आहेत...