आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया:अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे ट्विटर अकाउंट झाले होते हॅक, हॅकरने अकाउंटचे नाव बदलून केले होते एलन मस्क

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रोफाइल फोटोसोबतही छेडछाड करत त्यावर रॉकेट लाँचचा फोटो ठेवण्यात आला होता.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे ट्विटर अकाउंट शनिवारी 21 ऑगस्टला संध्याकाळी हॅक झाले होते. एवढंच नाही तर यासोबतच त्यांचा प्रोफाइल फोटो देखील हॅकर बदलून टाकला होता. याशिवाय त्यांच्या अकाउंटचे नाव बदलून एलन मस्क असे ठेवण्यात आले होते.

प्रोफाइल फोटोसोबतही छेडछाड करत त्यावर रॉकेट लाँचचा फोटो ठेवण्यात आला होता. या सगळ्यात शत्रुघ्न सिन्हा यांना मात्र त्यांचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती नव्हती. शत्रुघ्न सिन्हा यांचे अकाउंट हॅक करणा-याने प्रोफाइलवरील नाव आणि डीपी बदलला होता, पण त्याचे पासवर्ड बदलले नव्हते.

जेव्हा शत्रुघ्न सिन्हा त्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे समजले तेव्हा त्यांनी ट्वीट करून त्यांच्या फॉलोअर्सना याची माहिती दिली. त्यांनी लिहिले होते, 'दुर्दैवाने काही लोकांनी माझे ट्विटर अकाउंट काही तासांसाठी हॅक केले होते. पण आता हे सर्व ठीक झाले आहे. कृपया क्रिप्टोकरेंसीबाबत करण्यात आलेल्या सर्व ट्वीट्सवर दुर्लक्ष करा. तुमच्या काळजीसाठी आभार.'

ट्विटर अकाउंट हॅक होण्याआधी शत्रुघ्न सिन्हा यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त ट्वीट केले होते. याशिवाय त्यांनी शशी थरूर यांच्याबाबतही एक ट्वीट केले होते. आता त्यांचे अकाउंट पुर्ववत झाले आहे.

अलीकडेच अभिनेत्री कंगना रनोट हिनेदेखील सांगितले होते की, चीनच्या एका हॅकरने तिचे इंस्टाग्रा अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...