आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालता मंगेशकर यांच्या आवाजाने जगाला वेड लागले, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी आयुष्यभर लग्न केले नाही, परंतु त्या प्रेमापासून दूर राहू शकल्या नाहीत. त्यांनी प्रेमही असे केले की, संपूर्ण आयुष्य त्यांच्या नावे केले. राजस्थानच्या पूर्वीच्या डुंगरपूर राजघराण्यातील राज सिंह यांच्यावर त्यांचे प्रेम जडले होते. राज दीदींना प्रेमाने मिठू्ठू म्हणायचे.
दोघांनाही क्रिकेटची आवड होती
लता मंगेशकर आणि राजसिंह डुंगरपूर यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर कधी झाले, याची दोघांनाही कल्पना नव्हती. राज यांना लताजींच्या गाण्यांचे वेड होते. ते नेहमी खिशात टेपरेकॉर्डर घेऊन त्यांची गाणी ऐकत असत. लतादीदींची क्रिकेटची आवडही लपून राहिलेली नाही. राज यांना क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी त्या अनेकदा मैदानावर जात असत. दोघे अनेकदा भेटत असत.
पहिल्या भेटीतच जडले होते प्रेम
राज 1959 मध्ये लॉ करण्यासाठी मुंबईला गेले. त्यांना क्रिकेट खेळण्याचीही आवड होती. ते 1955 पासून राजस्थान रणजी संघाचे सदस्य होते. लतादीदींचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांची मुंबईतील क्रिकेट मैदानावर भेट झाली. त्याचे भाऊ अनेकदा राज यांना घरी घेऊन जायचे. राज सिंह यांचा पहिल्या भेटीतच लतादीदींवर जीव जडला होता. हळू हळू संवाद सुरु झाला. लता रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असायच्या. व्यस्त वेळापत्रकामुळे जास्त भेट होऊ शकत नव्हती. राज त्यांची गाणी ऐकून त्यांची उणीव पूर्ण करत असे. मोकळा वेळ मिळताच दोघेही भेटायचे.
दोघांना लग्न करायचे होते
असे म्हटले जाते की राज आणि लता एकमेकांना खूप पसंत करत होते. प्रेम वाढत होतं. दोघांनाही लग्न करायचे होते. राज एकदा आई-वडिलांना म्हणाले होते, कोणतीही सामान्य मुलगी तुमच्या राजघराण्याची सून होणार नाही. लतामध्ये अनेक गुण होते, पण त्या साध्या कुटुंबातील होत्या. राज हे कुटुंबासमोर झुकले. लग्न न होऊनही दोघांनी एकमेकांना साथ दिली. अनेक धर्मादाय संस्थांमध्ये एकत्र काम केले. मात्र, दोघांचे प्रेम फक्त आठवणीच राहिले.
कोण होते राज सिंह?
राज सिंह यांचा जन्म 19 डिसेंबर 1935 रोजी राजस्थानमधील डुंगरपूर येथे एका राजघराण्यात झाला होता. ते डुंगरपूरचे महाराज लक्ष्मण सिंह यांचे धाकटे पुत्र होते. राज सिंह यांनी 1955 ते 1971 पर्यंत 86 प्रथम श्रेणी सामने खेळले. ते 16 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आणि सुमारे 20 वर्षे बीसीसीआयशी संबंधित होते. 12 सप्टेंबर 2009 रोजी त्यांचे निधन झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.