आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे कमाल आर खान उर्फ केआरके. तो कायम या ना त्या कारणाने सेलिब्रिटींवर निशाणा साधत असतो. आता त्याने सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेल्या अभिनेत्री हर्षाली मल्होत्राला लक्ष्य केले आहे. वयाच्या 7 व्या वर्षी हर्षालीने बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नी हे पात्र साकारुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हर्षाली आता 13 वर्षांची झाली असून अलीकडेच तिने आपली काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यानंतर केआरकेने एक ट्विट करत तिच्यासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे.
काय म्हणाला केआरके?
केआरकेने एक ट्विट करत हर्षाली कधीही मोठी अभिनेत्री होणार नाही, असे म्हटले आहे. “मी 100 टक्के खात्री देतो ही मुलगी कधीही मोठी अभिनेत्री होऊ शकणार नाही. लहानपणीच प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक बालकलाकाराची हीच समस्या आहे. ही मुले स्वत:ला सुपरस्टार समजू लागतात. पण त्यांना देखील पुन्हा एकदा शुन्यापासूनच सुरुवात करावी लागते.” अशा आशयाचे ट्विट करुन केआरकेने हर्षालीवर निशाणा साधला आहे.
8000 मुलांमधून झाली होती निवड
एका मुलाखतीत 'बजरंगी भाईजान'चे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी खुलासा केला होता की, हर्षलीला मुन्नीच्या भूमिकेसाठी 8000 मुलांमधून निवडण्यात आले होते. सुरुवातीला तीन मुलींना शॉर्ट लिस्ट करण्यात आले होते. 7-10 दिवसांच्या वर्कशॉपनंतर हर्षाली ही भूमिका साकारणार हे निश्चित झाले होते. 'बजरंगी भाईजान' व्यतिरिक्त हर्षाली 'कुबूल है' आणि 'लौट आओ तृषा' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.