आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खानला दिलासा मिळाला आहे. आज शिझानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने त्याला जामीन मंजुर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिझानला जामीन मंजुरा झाला आहे. तब्बल 70 दिवसांनंतर शिझान तुरुंगाबाहेर येणार आहे.
याआधी शिझानने वसई कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता, तो कोर्टाने फेटाळला होता. यानंतर शिझानने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात वालिव पोलिस ठाण्याच्या वतीने 500 पानी आरोपपत्र वसई न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
13 जानेवारी रोजी वसई न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता
यापूर्वी 13 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत वसई न्यायालयाने शिझानचा जामीन अर्ज फेटाळला होता. सुनावणीदरम्यान शिझानच्या वकिलांनी त्याला जामीन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. यावेळी त्यांनी आरोपीच्या बचावासाठी अनेक दावेही केले. मात्र, विनंती करूनही शिझानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
24 डिसेंबर रोजी तुनिषाने केली होती आत्महत्या
24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषाने 'अली बाबा : दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी तक्रार शिझानविरोधात तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. शिझान आणि तुनिषा रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 15 डिसेंबरला दोघांचे ब्रेकअप झाले आणि 16 डिसेंबरला तुनिषाला पॅनिक अटॅक आला होता. 24 डिसेंबर रोजी तुनिषाने आत्महत्या केली तेव्हा शिझान हा तुनिषाला भेटणारा शेवटचा व्यक्ती होता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही या गोष्टीची पुष्टी झाली आहे. ब्रेकअपनंतर तुनिषा डिप्रेशनमध्ये असल्याचे कोर्टाने मान्य केले होते.
तुनिषा कुठे फाशी घेतली
शूटिंगदरम्यान सेटवरील मेकअप रूममध्ये तुनिषाने गळफास लावून घेतला. ही मेकअप रूम शिझान खानची होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर शिझानने सांगितले होते की, जेव्हा तो शूटिंगवरून परतला तेव्हा खोली आतून बंद होती. दार न उघडल्याने तो तोडण्यात आला. तुनिषा बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
जामीन मिळाल्यास शिझान पुरावे नष्ट करेल
या आधीच्या सुनावणीत तुनिषाच्या वकिलांनी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आणि मोनिका जाधव प्रकरणाचा संदर्भ देत तपास अधिकाऱ्यांची इच्छा असेल तोपर्यंत आरोपींना जामीन देता येणार नाही, असे म्हटले होते. शिझानला जामीन मिळाल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असे तुनिषाच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर म्हटले. तुनिषाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे असे 21 पुरावे आहेत, ज्यावरून शिझानने तुनिषाचा वापर केला आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले हे उघड होते.
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खानच्या जामीन अर्जावर आज (17 फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, गुरुवारी वालिव पोलिस ठाण्याच्या वतीने 500 पानी आरोपपत्र वसई न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी शिझानने वसई कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता, तो कोर्टाने फेटाळला होता. यानंतर शिझानने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.