आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान खानला जामीन मंजुर झाला असून तो रविवारी तुरुंगाबाहेर आला. तब्बल 70 दिवसांनंतर त्याला कोर्टाकडून जामीन मंजुर झाला. न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर शीझानला जामीन मंजूर केला आहे. शीझानच्या सुटकेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बाहेर आल्यानंतर शीझानने पहिल्यांदा मीडियाशी संवाद साधला. मला तिची खूप आठवण येतेय, असे शीझान म्हणाला.
आज मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजला
बाहेर आल्यावर तुनिषाबद्दल विचारल्यावर शिझान ‘इटाइम्स’शी संवाद साधताना म्हणाला, 'मला तिची खूप आठवण येत आहे, आज जर ती हयात असती तर तिनेही माझ्यासाठी लढा दिला असता.'
याबरोबरच तुरुंगातून बाहेर आल्यावर कुटुंबाला भेटून भावूक झालेला शिझान म्हणाला, 'आज मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजला आहे. माझी आई आणि बहीणींना पाहून मला अश्रू अनावर झाले, अखेर मी माझ्या कुटुंबाला पुन्हा भेटलो. पुढचे काही दिवस मला माझ्या आईच्या हातचं खायचं आहे, फक्त तिच्या मांडीवर डोकं ठेवून निपचित पडायचं आहे. मला माझ्या भावंडांबरोबर वेळ घालवायचा आहे.'
शीझान दोन महिने तुरुंगात होता
शीझान खानला 25 डिसेंबर 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. 13 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत वसई न्यायालयाने शीझानचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर शीझानने उच्च न्यायालयात धाव घेतली. 17 फेब्रुवारीला हायकोर्टातूनही शीझानला दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वालीव पोलिसांनी 500 पानी आरोपपत्र दाखल केले होते.
तुनिषाची सेटवर गळफास लावून आत्महत्या
टीव्ही अभिनेत्री तुनिषाने 24 डिसेंबर रोजी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर काही तासांनंतर तिच्या आईच्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शीझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली. तुनिषाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीझानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शीझान आणि तुनिषा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.