आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण:शेफाली शाह म्हणाली - 'मी आणि माझे कुटुंब Covid-19 पॉझिटिव्ह नाही, कुणीतरी माझे एफबी अकाऊंट हॅक केले आणि चुकीची बातमी पसरवली'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही सर्व घरी आहोत आणि सुरक्षित आहोत, असे शेफाली शाह म्हणाली आहे.

अभिनेत्री शेफाली शाहने स्पष्टीकरण देताना सांगितले की, मंगळवारी कुणीतरी तिचे फेसबुक अकाऊंट हॅक केले आणि तिच्या कुटुंबाला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची खोटी बातमी पसरविली. शेफालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लांब नोट लिहून म्हटले आहे की, ती आणि तिचे कुटुंब सुरक्षित आहेत.

  • शेफाली म्हणाली - 'आम्ही ठीक आहोत'

शेफालीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी सांगू इच्छिते की, मी ठीक आहे आणि सर्वजण ज्या पद्धतीने या परिस्थितीचा सामना करत आहेत, तसाच आम्हीही करत आहोत. मी कधीही एवढ्या नकारात्मक गोष्टी कधीच स्वीकारल्या नाहीत. आम्ही सर्व घरी आहोत आणि सुरक्षित आहोत. माझ्या नावाने जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही कोरोना पॉझिटिव्ह नाही. (हे कोणी लिहिले आहे ते देव जाणतो).'

  • लोकांचे मानले आभार

शेफाली पुढे म्हणाली, 'माझे फेसबुक अकाऊंट काल रात्री कुणीतरी हॅक केले होते आणि जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा लोकांचे मेसेज येऊ लागले होते, प्रत्येकजण मला माझ्या तब्येतीबद्दल विचारत होता. प्रत्येकाने माझी काळजी घेतली, ज्यांपैकी बरेच लोक असे होते ज्यांना मी नीट ओळखतही नाही, पण प्रत्येकजण मला माझ्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगत होता, आपण सर्वांनी खूप काळजी घेतली याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. '

  • कोरोनासाठी शेफालीने केली आहे जनजागृती

काही दिवसांपूर्वी शेफालीने लोकांना जागरुक करण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, त्यात तिने पॉलिथिनने स्वतःचा चेहरा झाकला होता आणि कोरोनाचा विषाणू कशाप्रकारे आपल्यावर हल्ला करतो ते सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...