आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री शेफाली शहाने टेलिव्हिजन, चित्रपट, थिएटर आणि आता ओटीटी प्लेटफार्मसह सर्वच मंचावर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. आता, ती 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी' ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या लघुपटाची कथा शेफालीची असून त्याचे दिग्दर्शनदेखील तिनेच केले आहे. सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड सोबत या चित्रपटाचे पाहिले पोस्टर तिने प्रदर्शित केले आहे. हा लघुपट रॉयल स्टॅग बॅरल सेलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सद्वारे प्रस्तुत करण्यात आला असून लवकरच प्रदर्शित होणार आहे.
शेफालीने आपल्या सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना लिहिले, 'मी एका नवीन दिशेकडे झेप घेतली आहे. त्यामुळे तुमची साथ असू द्या.'
शेफाली 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी'च्या निमित्ताने, एक अशी कथा पडद्यावर आणणार आहे ज्यामध्ये समान परिस्थितीतून जाणाऱ्या हजारों महिलांची कहाणी सामील आहे. शेफालीद्वारे दिग्दर्शित या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले आहे. 'समडे'नंतर शेफाली दिग्दर्शित हा दूसरा लघुपट आहे.
या लघुपटाबाबत बोलताना शेफाली म्हणाली की, "ही आपल्यामधल्या सर्वांचीची गोष्ट आहे, जे आपले नाते, कुटुंब, घरामुळे ओळखले जात असतात. एक असा पर्याय जो आपण आनंदाने निवडतो. मात्र, आपण सर्वांनीच हे अनुभवले असेल की कधी कधी या सर्व जबाबदाऱ्या सोडून देण्याची गरज निर्माण होते. कोविडमुळे झालेल्या लॉकडाउनने आपल्यावर सर्वांपासून वेगळे पडण्याची प्रबळ भावना निर्माण केली, परंतु काय झाले असते जर यावर एखादी वेगळी विचारधारा लागू करता आली असती. हॅप्पी बर्थडे मम्मीजीचे कथानक एका महिलेचा भावनात्मक प्रवास आहे, ज्याच्यासोबत प्रत्येक महिला स्वतःला जोडून घेऊ शकते.'
लवकरच शेफाली आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत 'डार्लिंग्स' मध्ये दिसणार आहे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.