आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहनाजच्या दुसऱ्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा:जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि रितेश देशमुखसोबत झळकणार, पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहनाज गिलने तिच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून 100% असे तिच्या चित्रपटाचे शीर्षक आहे. शहनाजने सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर करून तिच्या दुसऱ्या बॉलिवूड चित्रपटाची माहिती दिली आहे. या चित्रपटात शहनाज व्यतिरिक्त रितेश देशमुख, जॉन अब्राहम आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा विनोदी चित्रपट पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

रिलीज झाले मोशन पोस्टर

हे 29 सेकंदाचे मोशन पोस्टर टेक्स्ट बेस्ड आहे, ज्यामध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. टिझरमध्ये लिहिले आहे, '20% कॉमेडी, 20% रोमान्स, 20 संगीत, 20% गोंधळ, 20% अॅक्शन एकत्र आम्ही 100% आहोत.' टिझरमध्ये पुढे लिहिले आहे की 'प्रेमाबद्दल, लग्नाबद्दल, कुटुंबाबद्दल आणि हेरांबद्दलचा चित्रपट.' शहनाजच्या पोस्टच्या कॅप्शन लिहिले - 'अॅक्शन, संगीत आणि गुप्तहेरांनी भरलेली रोलर कोस्टर कॉमेडी, आम्ही तुम्हाला 100% मनोरंजनाची हमी देतो. पुढची दिवाळी आणखी खास असणार आहे, तुम्ही तयार आहात का?'

#MeToo आरोपानंतर परतणार आहे साजिद खान

पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणाऱ्या 100% या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान करणार आहे. 2018 साली झालेल्या Me-Too आरोपानंतर साजिद खान पुन्हा एकदा कॉमेडी चित्रपटातून कमबॅक करणार आहे. यापूर्वी, साजिदने हाऊसफुल फ्रँचायझीचे 3 भाग दिग्दर्शित केले आहेत, जे प्रेक्षकांना आवडले आहेत.

डिसेंबरमध्ये रिलीज होणार डेब्यू फिल्म
शहनाजचा पहिला चित्रपट 'किसी का भाई किसी का जान' या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, जैसी गिल, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...