आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी इमोशनल झाली शहनाज गिल:अनसीन फोटो शेअर करत म्हणाली - 'मी तुला पुन्हा भेटेन'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेते सिद्धार्थ शुक्ला याचा आज वाढदिवस आहे. तो आज हयात असता तर त्याने वयाची 42 वर्षे पू्र्ण केली असती. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची खास मैत्रीण शहनाज गिल हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून त्याची आठवण काढली आहे. शहनाजने केकचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यावर सिड असे लिहिले आहे. यासोबतच शहनाजने सिद्धार्थला मिठी मारणारा त्यांच्या एक अनसीन फोटोही शेअर केला आहे.

मी तुला पुन्हा भेटेन
शहनाजने सिद्धार्थचा फोटो शेअर करत लिहिले, 'मी तुला पुन्हा भेटेन. 12 12.' अतिशय मोजक्या शब्दांत शहनाजने सिद्धार्थबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शहनाजची ही पोस्ट पाहून ती सिद्धार्थला खूप मिस करत असल्याचे दिसतंय.

ही शहनाजची सोशल मीडिया पोस्ट आहे.
ही शहनाजची सोशल मीडिया पोस्ट आहे.
सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त हा केक शहनाजने कापला.
सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त हा केक शहनाजने कापला.

लोकांनी शहनाजला खंबीर राहण्याचे आवाहन केले
शहनाजची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांनी शहनाजला खंबीर राहण्याचे आवाहन केले आहे. तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री कश्मिरा शाहने लिहिले, 'होय आणि तो सदैव आपल्या सर्वांच्या हृदयात राहील.' एका यूजरने लिहिले, 'मला अजूनही सिद्धार्थ आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाहीये,' असे म्हटले आहे.

सिद्धार्थ-शहनाज लग्न करणार होते
शहनाज आणि सिद्धार्थ 'बिग बॉस 13' मध्ये एकत्र दिसले होते. शोमध्येच दोघांची चांगली मैत्री झाली होती आणि त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. या शोमध्ये सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. शो संपल्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. असे म्हटले जाते की, सिद्धार्थ आणि शहनाज रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच लग्न करणार होते. मात्र दोघांनी कधीही त्यांचे नाते अधिकृत केले नव्हते.

शहनाजने हा अनसीने फोटो तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केला आहे.
शहनाजने हा अनसीने फोटो तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केला आहे.
या फोटोत शहनाजने सिद्धार्थचा हात पकडलेला दिसत आहे.
या फोटोत शहनाजने सिद्धार्थचा हात पकडलेला दिसत आहे.

मागील वर्षी झाला होता सिद्धार्थचा मृत्यू
गेल्यावर्षी 2 सप्टेंबर रोजी वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचे निधन झाले होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तातडीने त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधे घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतरच त्याची प्रकृती खालावली होती. शहनाजच्या मांडीवर सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...