आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस 16 च्या आगामी एपिसोडमध्ये, शहनाज गिल तिचे नवीन गाणे 'घनी सयानी'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे. या प्रमोशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज सलमान खानसोबत 'दिल दियां गल्लां' या रोमँटिक गाण्यावर स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सलमान 'बिग बॉस 13' मधील प्रवेशाबद्दल शहनाज गिलला चिडवताना दिसेल. सलमान म्हणतो, शहनाज जेव्हा पहिल्यांदा सलवार-सूटमध्ये आली तेव्हा ती खूप घाबरली होती. हे ऐकून ती भाईजान म्हणते आणि सलमानला मिठी मारते. आता हा व्हिडिओ समोर येताच चाहते बिग बॉसच्या पुढच्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शहनाज गिल बिग बॉस 13 ची स्पर्धक होती. या शोमधून ती प्रसिद्धीझोतात आली. आता अलीकडेच एमसी स्क्वायरसोबतचा तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ 'घनी सयानी' रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने रॅप देखील केले आहे. व्हिडिओ पहा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.