आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहनाज गिलने केले ग्लॅमरस फोटोशूट:कॅमेऱ्यासमोर दिल्या सिझलिंग पोझ, चाहते म्हणाले - नॅशनल क्रश

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 13' फेम शहनाज गिल सध्या तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दरम्यान, शहनाजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ब्लू शॉर्ट्स आणि ब्लू जॅकेटमध्ये अप्रतिम दिसत आहे. तिची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे. डार्क लिपस्टिक आणि मोकळ्या केसांनी तिने हा लूक कम्प्लीट केला आहे. यादरम्यान ती कॅमेऱ्यासमोर सिझलिंग पोझ देताना दिसतेय.

यूजर्सनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ शेअर करताना शहनाज गिलने लिहिले- 'कॅप्शन द्या'.

यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले- 'संपूर्ण जगाचे यश तुला मिळो, हीच प्रार्थना.' तर आणखी एका चाहत्याने लिहिले, 'कुणी तरी एसी लावा रे...' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'हिचे डोळेच सर्वकाही सांगून जातात.' या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

बातम्या आणखी आहेत...