आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत नुकत्याच झालेल्या अवॉर्ड शोमध्ये शहनाज गिल स्टायलिश रेड ड्रेसमध्ये दिसली. अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी शहनाजने क्लासिक रेड कलर निवडला. तिने तिचा संपूर्ण पोशाख लाल रंगाचा परिधान केला होता.
शहनाज गिल शॉर्ट रेड ड्रेसमध्ये दिसली
शहनाज गिलने रेड कलरचा शॉर्ट ड्रेस त्याच रेड कलरच्या ब्लेझरसोबत पेअर केला. तिने तिचे केस उघडे ठेवले आणि हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला. तिने तिचा मेकअप न्यूड ठेवला होता. स्टाइल स्टेटमेंट करण्यासाठी शहनाजने फक्त खांद्यावर ब्लेझर ओढला.
चाहत्यांना आवडली शहनाजचे सिलेक्शन
लाल रंगाच्या ड्रेस निवडल्याबद्दल तिचे चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. शहनाजच्या या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले - सना रेड आउटफिटमध्ये तू खूप सुंदर दिसत आहेस ! तर एका यूजरने लिहिले - लाल आणि पिवळा हेच तुझे कलर आहेत सना, या रंगात तू खूप छान दिसते.
लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण
तुम्हाला माहिती असेल की, शहनाज गिल लवकरच सलमान खान आणि पलक तिवारीसोबत 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.