आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विट:सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर शेखर कपूर यांचे धक्कादायक ट्विट, म्हणाले - मला तुझ्या वेदनांची जाणीव होती   

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुला ज्या लोकांनी दूर लोटले त्यांच्याबद्दल मला ठाऊक असल्याचे शेखर कपूर यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्येत होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले जात आहे. 15 जून रोजी सकाळी त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेद झाले असून त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यात फास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने सुशांतचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तीन डॉक्टरांच्या टीमनं सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली. त्यानंतर वांद्रे ठाण्यात त्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे.

सुशांत सिंहने आत्महत्या केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत, अद्याप कोणतीही नोट मिळाली नसल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी सांगितले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. जे तुझ्याबाबतीत घडले त्यात तुझा दोष नाही. तुला ज्या लोकांनी दूर लोटले त्यांच्याबद्दल मला ठाऊक असल्याचे शेखर कपूर यांनी म्हटले आहे. 

तू कोणत्या तणावाखाली होतास, हे मला ठाऊक होते - शेखर कपूर 

शेखर कपूर यांनी ट्विट केले, "सुशांत तुझ्या वेदनांची तुला ज्या लोकांनी दूर लोटले आणि निराश केले त्या लोकांबाबत मला माहीत आहे. त्यांच्याबद्दल सांगताना तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत होतास. गेल्या सहा महिन्यात तू तुझ्याबरोबर असायला हवा होतो. मला वाटते तू माझ्याशी बोलायला हवे होते. तुझ्यासोबत जे काही घडले ते त्यांचे कर्म आहे तुझे नाही," असे शेखर कपूर यांनी म्हटले आहे.

शेखर कपूर यांनी केलेल्या ट्विटवरुन सुशांतला इंडस्ट्रीत डावलण्यात तर येत नव्हतं ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...