आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलेब लाइफ:11 वर्षाच्या मुलाला गमावल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेले होते शेखर सुमन, धाकटा मुलगा अध्ययनच्या जन्मानंतर आयुष्यात परतला आनंद

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेखर सुमन यांनी गमावला आपला मोठा मुलगा

अलीकडेच अभिनेता अध्ययन सुमन यांच्याविषयीची एक खोटी बातमी समोर आली होती. यात अध्ययनने आत्महत्या केल्याचे म्हटले गेले होते. एका वृत्तवाहिनीने ही खोटी बातमी दाखवली होती. त्यानंतर अध्ययनचे वडील आणि अभिनेते शेखर सुमन यांनी ही निंदनीय घटना असल्याचे म्हटले होते. शेखर यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा ही खोटी बातमी समोर आली तेव्हा अध्ययन दिल्लीत होता. या बातमीमुळे कुटुंबात खळबळ उडाली होती. अशा खोट्या बातमीसाठी वाहिनीने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, असे ते म्हणाले.

शेखर सुमन यांनी आपल्या जीवनात बरेच चढउतार पाहिले आहेत. त्यांच्या आयुष्यातला एक काळ असा होता, जेव्हा ते डिप्रेशनमध्ये गेले होते.

शेखर सुमन यांनी गमावला आपला मोठा मुलगा
शेखर सुमन यांचा मोठा मुलगा आयुषला एंडोकार्डियल फायब्रोएलास्टोसिस नावाचा एक दुर्मिळ हृदयाचा आजार होता, ज्यामुळे त्याचे वयाच्या 11 व्या वर्षी निधन झाले. मुलगा गमावल्यानंतर शेखर नैराश्यात गेले होते. ते आणि त्यांची पत्नी अलका इतके नैराश्यात होते की त्यांना जगण्याची इच्छा नव्हती.

शेखर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते होते की, आयुष निघून गेल्यानंतर त्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर यायला बरीच वर्षे लागली. 1988 मध्ये त्यांचा दुसरा मुलगा अध्ययनचा जन्म झाला. त्यांना 'देख भाई देख' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे शेखर यांना इंडस्ट्रीत ओळख मिळाली. शेखर यांचे काम व्यवस्थित सुरू झाल्यानंतर अलका यांनी त्यांच्या लहान मुलावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली.

अलका यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही गेल्या 38 वर्षांपासून एकत्र आहोत. आम्ही आयुष्यात बरेच उतार-चढाव एकत्र पाहिले परंतु दोघांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. आम्ही दोघेही एकमेकांचे सर्वात मोठे सपोर्टर आहोत.

1983 मध्ये लग्न झाले

शेखर आणि अलका हे दोघेही 80 च्या दशकात दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी होते. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. अलका यांना पाहिल्यावर शेखर त्यांच्या प्रेमात पडले होते. अलकामध्ये वेगळेच काही होते, ज्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो, असे शेखर यांनी सांगितले होते. तर एका मुलाखतीत अलका म्हणाल्या होत्या, शेखर यांना बघितल्यानंतर याच व्यक्तीसोबत आपण आपले आयुष्य व्यतित करु शकतो, असे त्यांना वाटले होते. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.

काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी आई-वडिलांना आपल्या नात्याबद्दल सांगितले. या दोघांच्या लग्नाला त्यांच्या पालकांचा विरोध नव्हता. दोघांनीही लवकरच लग्न करावे अशी कुटुंबाची इच्छा होती. याच काळात अलकाने फॅशन डिझायनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि शेखर यांना श्रीराम सेंटर दिल्ली येथे नोकरी मिळाली. त्यावेळी शेखर यांचा पगार 600 रुपये होता. 4 मे 1983 रोजी दोघांनी लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...