आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:अभिनेता शेखर सुमनला मातृशोक, म्हणाला - 'तिच्या जाण्यामुळे अनाथ आणि उद्धवस्त झाल्याची भावना निर्माण झाली आहे'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेखर सुमनने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

अभिनेता शेखर सुमनच्या आईचे निधन झाले आहे. स्वतः शेखर सुमननेच सोशल मीडिया अकाउंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. शेखर सुमनने लिहिले आहे, 'माझी प्रिय आई जिने माझ्यावर सर्वात जास्त प्रेम केले तिचे निधन झाले आहे. तिच्या जाण्यामुळे अनाथ आणि उद्धवस्त झाल्याची भावना निर्माण झाली आहे. ती माझ्यासोबत कायम होती. त्याबद्दल आईचे मनापासून आभार. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्या आठवणीत राहणार आहेस. तू आम्हाला दिलेल्या आशिर्वादासाठी आभार,' अशा शब्दांत शेखरने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

किडनी ट्रान्सप्लांटनंतर गंभीर झाली होती प्रकृती
काही दिवसांपूर्वी शेखर सुमनच्या आईचे किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. शेखर सुमनचा मुलगा अध्ययनने देखील आपल्या आजीच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने लिहिले, 'आमची प्रेमळ आजी आता शांत झाली आहे. तू खूप कणखर होती. शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या आजाराशी लढत होती. तिच्यासाठी प्रार्थना.'

यापूर्वीच्या आपल्या एका पोस्टमध्ये अध्ययनने आजीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन चाहत्यांना केले होते.

अध्ययनने लिहिले होते, 'अनेक लोकांना माहिती नाही की मी दर बुधवारी मंदिरात जातो आणि गणपतीची आराधना करतो आणि चांगल्या प्रकृतीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करतो. अनेक वर्षे देवाने माझ्यावर कृपा केली होती. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या आजीसाठी देवाकडे प्रार्थना करा.'

बातम्या आणखी आहेत...