आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वडिलांचे दुःख:पाटण्याला जाऊन शेखर सुमन यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची भेट, म्हणाले - 'ते अजूनही तीव्र धक्क्यात आहेत'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या अनेक दिवसांपासून शेखर सुमन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.

अभिनेता शेखर सुमन सोमवारी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पाटण्यात पोहोचले होते. त्यांच्यासोबत सुशांतचा जवळचा मित्र आणि निर्माता-दिग्दर्शक संदीप सिंह उपस्थित होता. दोघांनीही सुशांतचे वडील आणि बहिणीचे सांत्वन केले. शेखर यांनी या भेटीचे काही फोटो ट्विटरवर शेअर करताना लिहिले, 'मी सुशांतच्या वडिलांना भेटलो आणि त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही मिनिटे बसलो आणि काहीही बोललो नाही. ते अजूनही तीव्र धक्क्यात आहेत. अशा वेळी, दुःख व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे काही न बोलणे', असे ते म्हणाले. 

यापूर्वी रविवारी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये शेखर म्हणाले होते, 'मी माझ्या गावी पाटणा येथे जात आहे, तेथे मी सुशांतच्या वडिलांना भेटून त्यांचे सांत्वन करीन, सोबतच मी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि सुशांतच्या चाहत्यांनाही भेटेल आणि या प्रकरणात सीबीआय चौकशीच्या मागणीला समर्थन देण्याचे आवाहन करेल.

शेखर यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे: गेल्या अनेक दिवसांपासून शेखर सुमन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. 26 जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, '#justiceforSushantforum प्रिय सुशांत, देश तुझ्या सोबत आहे, लोक तुझ्या पाठीशी आहेत, आम्ही तुला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि नक्कीच न्याय मिळेल. आम्ही तुला कायम आमच्या आठवणीत ठेऊ.'

पुन्हा चौकशीसाठी आवाज उठवा: शेखर यांनी 25 जून रोजी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “सुशांतचा मृत्यू ही एक साधी आत्महत्या असल्याचे जाहीर झाले आहे. यामुळे निराश होऊ नका, मला असे काही होईल याचा अंदाज आला होता. कथा पुर्वनियोजित केली होती. म्हणूनच, हा फोरम आपल्या सर्वांसाठी अधिक महत्त्वपूर्ण झाला आहे. कृपया पुन्हा चौकशीसाठी आपला आवाज उठवा.'