आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्न फिल्म प्रकरण:शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीवर साधला निशाणा, शिल्पा म्हणाली होती - 'कामात व्यस्त असल्याने राज काय करतो माहित नाही’

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शर्लिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला.

राज कुंद्रा पोर्न चित्रपट प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. यात 43 साक्षीदारांचा जबाब समाविष्ट आहे. यापैकी पाच जणांनी सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर आपले बयान नोंदवले आहे. त्यात शिल्पा शेट्टीच्या नावाचाही समावेश आहे. ‘कामात व्यस्त असल्याने राज काय करतो माहित नाही’ असा जबाब शिल्पा शेट्टीने दिला आहे.

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्राने 2015 मध्ये विआन इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे 24.50 टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल 2015 ते जुलै 2020 या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले.

शिल्पाच्या या जबाबानंतर शर्लिन चोप्राने तिच्यावर निशाणा साधला आहे. शर्लिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर म्हटले, ‘काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीदीचे म्हणणे आहे की कामात व्यस्त असल्याने राज काय करतो याविषयी माहिती नाही. इतकेच नाही तर पतीच्या संपत्तीचा स्त्रोत काय आहे याबद्दल देखील माहिती नसल्याचे शिल्पा म्हणाली. यात किती सत्य आहे हे तुम्हीच ठरवा. याला म्हणतात दीदी येडा बनाके पेडा खाना…’

शर्लिनने नोंदवला जबाब
क्राइम ब्रँचला दिलेल्या निवेदनात शर्लिन चोप्रा म्हणाली की, तिने 'द शर्लिन चोप्रा अ‍ॅप' नावाचे मोबाईल अ‍ॅप तयार केले होते, त्यासाठी राजच्या आर्म्सप्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत तिने करार केला होता. राज कुंद्रा व्यतिरिक्त सौरभ कुशवाह हा आर्म्सप्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावरआहेत. शर्लिन चोप्राचे व्हिडिओ आणि फोटो 'द शर्लिन चोप्रा अ‍ॅप'मध्ये शेअर केले जातात.

शर्लिन चोप्राला आर्म्सप्राईम मीडियाशी केलेल्या करारानुसार अॅपच्या उत्पन्नाचा 50% महसूल मिळणार होता, परंतु तिने निवेदनात म्हटले आहे की, तिला उत्पन्नाचा 1% देखील मिळाला नाही. त्यानंतर, राज कुंद्राने शर्लिन चोप्राशी संपर्क साधला आणि तिला 'हॉटशॉट' नावाच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनसाठी काम करण्यास सांगितले, जो आर्म्सप्राईम मीडियाचाही एक भाग होता.

निवेदनानुसार शर्लिनने दावा केला की, राज कुंद्राने तिला 'हॉटशॉट'चा कंटेंट खूप बोल्ड आणि हॉट असेल. त्यामुळे संकोच न बाळगता काम कर असे सांगितले होते. शर्लिन पुढे म्हणाली, हॉट शॉट अ‍ॅप्लिकेशन राज कुंद्राचेच होते. कुंद्रा आणि त्याच्या फर्मची क्रिएटिव्ह डायरेक्टर मीता झुनझुनवाला यांनी तिला काम करण्यासाठी भाग पाडले होते, असा दावा तिने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...