आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरण:शार्लिन चोप्राचे मोठे वक्तव्य - शिल्पा शेट्टीसोबतच्या नात्यात आनंदी नव्हता राज कुंद्रा, न सांगता घरी आला आणि माझ्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पासोबतचे राजचे नाते गुंतागुंतीचे आहे - शर्लिन

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात आपला जबाब नोंदवण्यासाठी शर्लिन चोप्रा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजर झाली होती. राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अॅपविरुद्ध अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री आता समोर आल्या असून त्यांनी राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप केला आहे. पण शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.

यापूर्वी शर्लिनने एप्रिल 2021 मध्ये राजविरोधात एफआयआर दाखल केला होता. राज कुंद्रा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने आपल्या अटकेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने 28 जुलै रोजी त्याची याचिका फेटाळत त्याला जामीन देण्यास नकार दिला.

शिल्पासोबतचे राजचे नाते गुंतागुंतीचे आहे - शर्लिन
शर्लिनने पोलिसांकडे नोंदवलेल्या आपल्या जबाबात सांगितले की, 27 मार्च 2019 रोजी एका बिझनेस मीटिंगनंतर एका मेसजवरुन तिचा राज कुंद्रासोबत मोठा वाद झाला होता. यानंतर राज न सांगता तिच्या घरी आला होता. शर्लिनने आरोप केला की, राजने यावेळी तिला बळजबरी किस करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा तिने विरोध केला होता. शर्लिनने सांगितल्यानुसार, तिला विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवायचे नव्हते. तसेच बिझनेसला खासगी आयुष्यातील आनंदाशीही जोडायचे नव्हते. शर्लिनने पुढे सांगितल्यानुसार, राजने तिला शिल्पासोबतचे त्याचे नाते गुंतागुंतीचे असून घरी तो तणावात असतो, असे सांगितले होते.

शर्लिनला अटक होण्याची होती भीती, मिळवला अटकपूर्व जामीन
2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आर्म्सप्राइम विरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये शर्लिन चोप्राला आरोपी ठरवले आहे. गुन्हे शाखेने शर्लिन चोप्राला 26 जुलै 2021 रोजी पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. आपल्या याचिकेत शर्लिनने म्हटले होते की, तिला राज कुंद्राप्रमाणे अटक होण्याची भीती आहे. शर्लिनला 28 जुलै रोजी कोर्टाने अंतरिम संरक्षण दिले.

शर्लिनचा राज कुंद्रासोबत झाला होता करार
शर्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर करार होता. हा करार भारताबाहेर कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील कंटेंट पुरवण्याचा होता. शर्लिन तिचा अ‍ॅप सेमी पॉर्न पद्धतीने चालवत असे. तिचे हे पार्टटाईम काम फार चांगले चालले नव्हते आणि काही काळानंतर शार्लिनला कुंद्राने स्पॉट केले. राज कुंद्राने शर्लिन चोप्राला सांगितले की, तिला या बदल्यात 50 टक्के नफा मिळेल. राजने स्वत: या करारावर सही केली होती. यातून तिने जून 2019 ते जुलै 2020 दरम्यान चांगली कमाई केली होती. मात्र, शर्लिनला समजले की तिला या करारानुसार पैसे मिळत नाहीत आणि म्हणूनच वर्षभरानंतर तिने हा करार संपुष्टात आणण्यास सांगितले. शर्लिनने पुन्हा तिचे स्वतःचे अ‍ॅप बनवले आणि काही महिन्यांपर्यंत हे काम केले. परंतु 2020 च्या ऑगस्टमध्ये तिच्या कंटेंटची पायरसी होत होती आणि तिने स्वत: याबद्दल तक्रार दिली होती.

बातम्या आणखी आहेत...