आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओटीटीवर रिलीज होतोय 'शेरनी':सेटवर कलाकारांच्या खोड्या काढायची विद्या बालन, कलाकारांना सोडून सर्वच पीपीई किटमध्ये राहात होते

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायोबबल फॉरमॅटसाठी निर्मात्यांनी गोंदियामध्ये बुक केले होते पूर्ण रिसॉर्ट
  • सेटवर सहकलाकारांच्या खाेड्या काढायची विद्या, नंतर क्रू मेंबर्सना ओरडायचे निर्माते

विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘शेरनी’देखील आता ओटीटीकडे वळणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने सोमवारी याची घोषणा केली. पुढच्या महिन्यात चित्रपटाचा ग्लोबल प्रीमिअर होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अमित मासुरकर आहेत. खरं तर, विद्याचा मागील सिनेमा ‘शकुंतला देवी’देखील ओटीटीवर रिलीज झाला हाेता. याविषयी खास माहिती यात काम करत असलेल्या इला अरुणने दिव्य मराठीला शेअर केली.

  • कलाकारांना सोडून सर्वच पीपीई किटमध्ये राहत होते : इला अरुण

इला अरुण यांनी खास बातचीतमध्ये सांगितले, या चित्रपटातील माझ्या आठवणीविषयी सांगायचे झाले तर मी एवढेच सांगेन की, घर असो की बाहेर महिलांना सर्वत्र शेरनी बनून राहायला हवे. या चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी दोन भागात झाले होते. गेल्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागण्याआधी भूतपलासी भागात याचे शूटिंग झाले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मध्यप्रदेशच्या बाळाघाटातील जंगलात शूटिंग झाले. कलाकारांना तेथून अडीच तासावर असलेल्या गोंदियामध्ये ठेवण्यात आले होते. नवरात्रीमध्येही आमचे शूटिंग सुरू होते. आम्ही सर्व गोंदियामधून बाळाघाटाला जाताना रस्त्यात देवीचे दर्शन घेऊन जायचो. विद्या सोबत हा माझा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी आम्ही ‘शादी के साइड इफेक्‍ट्स’ आणि ‘बेगम जान’मध्ये काम केले आहे. ऑक्टोबर महिन्यात लॉकडाऊनमध्ये थोडा दिलासा मिळाला होता, त्यानंतरही कलाकारांना सोडून सेटवर सर्वच म्हणजे दिग्दर्शक, सिनेमेटोग्राफर, क्रू मेंबर्स पीपीई किटमध्ये राहत हाेते. सेटवर निर्मांत्याकडून खूपच कडक नियमांचे पालन केले जात हाेते.

  • सेटवर विद्या खोड्या काढायची आणि इतरांना बोलणी बसायची

चित्रपटात विद्या बालन सशक्त महिला वन अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. जी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठ्या प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असते. ती खूपच निडर दाखवण्यात आली आहे. मात्र या पात्राच्या पलीकडे विद्या बालन आहे. सेटवर तिचे दुसरेच रूप पाहायला मिळाले. विद्या सेटवर खूप धमाल करायची. इतरांच्या खोड्या काढायची. गमंत म्हणून फलाण्याने मास्क घातला नाही, त्याने नियमाचे पालन केले नाही, म्हणून ओरडायची त्यानंतर प्रॉडक्शन हाऊसचे ईपी येऊन त्या व्यक्तीला फटकारत असत. अशा प्रकारे आम्ही खूप चांगला वेळ घालवला. विद्या मुंबईवरुन आपला कुक घेऊन आली हाेती. गोंदियामध्ये तिचे वेगळे किचन सेटअप होते.

  • निर्मात्यांनी गोंदियामध्ये पूर्ण रिसॉर्टच बुक केले होते

निर्मात्यांच्या व्यतिरिक्त सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सदेखील सावधगिरी बाळगत सेट आणि हाॅटेलच्या बायोबलमध्ये राहत होते. निर्मात्यांनी बायोबबलसाठी एक वेगळीच पद्धत शोधून काढली होती. याविषयी ईला यांनी सांगितले, गोंदियामध्ये पूर्ण रिसॉर्टच बुक केला होता. या रिसाॅर्टमध्ये मोठा लॉन होता. शूटिंग पूर्ण होईपर्यंत कुणालाही रिसॉर्टमध्ये प्रवेश नव्हता. राज्य सरकारनेदेखील सुरक्षिततेची चांगली खबरदारी घेतली. शूटिंग सुरु असल्याचे किंवा येथे कलाकार थांबल्याचे खूपच कमी लोकांना माहित हाेते. कडक सुरक्षा व्यवस्थेमुळेच सेटवर कोणीच संक्रमित झाले नाही.

  • ‘शेरनी’ धाडसी आणि मजेदार सिनेमा : भूषण कुमार

या चित्रपटाविषयी निर्माते भूषण कुमार सांगतात, मी आतापर्यंत जितक्या चित्रपटाची निर्मिती केली, त्यापैकी ‘शेरनी’ सर्वात धाडसी आणि मजेदार चित्रपट आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर अमेझाॅन प्राइम व्हिडिओवर होणार असल्याने मी खुश आहे. त्यामुळे हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणाचे विक्रमचे सहकार्य लाभले. एबंडेंटिया एंटरटेनमेंटसोबत मिळून काम करण्यासाठी उत्सुक आहे. िसनेमात विद्यासह सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली. कोरोनामुळे हा थिएटर्स ऐवजी ओटीटीवर रिलीज करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...