आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आँखो देखी:युनिटच्या सदस्याचा खुलासा - विजय राजने सेटवर क्रू मेंबरचा हात धरुन स्वतःकडे खेचले होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय राजने बुधवारी चित्रीकरण केले

कौवा बिर्यानी फेम अभिनेता विजय राज काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी क्रूमधील एका महिला सहका-याचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली त्याला गोंदियात अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनवर त्याची सुटका करण्यात आली. आता ‘शेरनी’ या चित्रपटाच्या क्रू मेंबरने या घटनेचा आँखो देखा हाल सांगितला आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, विजय राजने तरुणाची हात धरला आणि तिला स्वतःकडे खेचले.

लक्ष वेधण्यासाठी हात पकडला होता

मिड डेच्या वृत्तानुसार, संपूर्ण घटना सेटवर उपस्थित 30 जणांसमोर घडली. सदस्याने सांगितले की, ती मुलगी बसली असताना विजयने तिचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी तिचा हात धरला. असे असले तरी, एखाद्या कामाच्या ठिकाणी महिला सहका-याशी वागण्याचा हा योग्य मार्ग नाही. विजयने तिचा विनयभंग केला नाही, हे स्पष्ट आहे.

विजयने लगेच माफी मागितली होती
सदस्याने सांगितले की, आपल्याकडून चूक झाली, हे लगेचच विजयच्या लक्षात आले आणि त्याने त्वरित मुलीची माफी मागितली, परंतु ती अतिशय दुःखी होती. त्या दिवशी ती खूप निराश होती. निर्मात्यांनी त्यादिवशीचे चित्रीकरण रद्द केले आणि त्यानंतर मुलीने तक्रार दिली. मात्र फिर्यादीच्या मित्राने सांगितले की, विजयने या तरुणीशी असे वागण्याची ही चौथी वेळ आहे.

सूत्राने सांगितल्यानुसार, शोषण अनेक प्रकारे होते आणि हा देखील शोषणाचा एक प्रकार आहे. मला माहित नाही की त्यांचा हेतू वाईट वागणे होता की नाही. मात्र त्यांनी असे केले.

विजय राजने बुधवारी चित्रीकरण केले
या घटनेनंतर विजय राजला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, विजय राजने बुधवारी शेरनी या चित्रपटाचे चित्रीकरण केले. अमित मसुरकर आणि विक्रम मल्होत्रा ​​यांनी अद्याप या प्रकरणावर कारवाई केलेली नाही. उर्वरित शूट आठवड्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश युनिटला देण्यात आले आहेत. विद्या बालनने आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले होते, त्यामुळे ती हॉटेलमध्ये थांबली होती.