आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मात्यांवर नाराज आहे 'शेरशाह'चा अभिनेता:चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचा मित्र सनीची भूमिका वठवणारा अभिनेता साहिद वैद म्हणाला -  'मी 'शेरशाह' साइन करायलाच नको होता'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्या कामाबद्दल लोक बोललेच नाहीत

'शेरशाह' या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता साहिल वैद आपल्या कामावर खूश नाहीये. त्याने चित्रपटाबद्दल जे विधान केले आहे त्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. साहिलच्या मते त्याने हा चित्रपट साइन करायलाच नको होता.

माझ्या कामाबद्दल लोक बोललेच नाहीत
साहिलने सांगितले, 'मला या चित्रपटात युद्धाच्या सीनमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. पण दिग्दर्शकांचे म्हणणे होते की, मी मित्र सनीच्या भूमिकेसाठीच ठिक आहे. मी धर्मा प्रॉडक्शनचा आभारी आहे की, त्यांनी मला हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्ये संधी दिली. त्यामुळे मी शेरशाह हा चित्रपट त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी केला.'

पुढे साहिल म्हणाला, 'चित्रपट खूप हीट झाला असला तरीही हे खूपच दुःखद आहे की, प्रेक्षकांनी चित्रपटातील सपोर्टिंग कास्टकडे दुर्लक्ष केले आहे. चित्रपटात अनेक कलाकारांनी आपला इगो बाजूला ठेवून छोट्या भूमिका साकारल्या आहेत. कारण त्यांना कामातून शहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांना श्रद्धांजली द्यायची होती. याच कारणाने मी देखील चित्रपट साइन केला होता. पण मला आता जाणवतंय की मी हा चित्रपट साइन करायलाच नको होता. मी चित्रपटात काय काम केले आहे याबद्दलही लोक बोललेले नाहीत.'

'शेरशाह' हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असून विष्णू वर्धन याचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा तर कियारा आडवाणीने त्यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची व्यक्तिरेखा साकारली आहे. कारगिल युद्धाचे रिअल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा या युद्धात शहीद झाले होते. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...