आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन आनंद:दोन महिन्यांच्या मुलीबरोबर खेळताना दिसली शिल्पा शेट्टी, सांगितले - '15' नंबर तिच्यासाठी का ठरला लकी नंबर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा शेट्टीच्या मुलीचा जन्म 15 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. शिल्पा आणि राज यांना एक मुलगा असून वियान हे त्याचे नाव आहे. समिशा हे त्यांचे दुसरे बाळ आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बुधवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या दोन महिन्यांच्या मुलीसोबत खेळताना दिसत आहे. समिशा हे शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या मुलीचे नाव आहे. या व्हिडिओद्वारे तिने सांगितले की, 15 नंबर त्यांच्यासाठी किती लकी असल्याचे सिद्ध होत आहे. याच तारखेला त्यांच्या मुलीचा जन्म झाला आणि याच तारखेला सोशल मीडिया अ‍ॅप ‘टिकटॅकक’वरही तिचे 15 मिलियन फॉलोअर्स झाले. यासाठी शिल्पाने लोकांचे आभार मानले.

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय- 'नंबर 15 माझ्यासाठी खूप लकी ठरतोय. सांगू का... माझी मुलगी 'समिशा' 15 फेब्रुवारी रोजी जन्माला आली, ती 15 एप्रिल रोजी दोन महिन्यांची झाली आहे. 15 एप्रिल रोजी 'टिक-टॉक'वर माझे 15 मिलियन फॉलोअर्स झालेत. धन्यवाद… धन्यवाद… धन्यवाद… खूप खूप. मनापासून धन्यवाद. लव्ह यू मित्रांनो.'

  • सर्वांचे आभार मानले

व्हिडिओसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये शिल्पाने लिहिले आहे की, 'जीवनातील काही गोष्टी इतरांपेक्षा विशेष असतात. आता त्या यादीमध्ये '15' क्रमांक देखील जोडला गेला आहे. आमची मुलगी समिषा शेट्टी कुंद्रा 15 फेब्रुवारीला आमच्या आयुष्यात आली आणि आज ती 15 एप्रिलला दोन महिन्यांची झाली. हा एक अतिशय विशेष आणि सुखद योगायोग आहे की, 15 एप्रिल रोजी टिकटॉकवर आमचे कुटुंबही  15 मिलियन (दीड कोटी) झाले. माझ्यावर आणि माझ्या कुटूंबावर वर्षानुवर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे... आशा आहे की येणा-या वर्षांतही तुम्ही खडकाप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहाल.'

बातम्या आणखी आहेत...