आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेट्टी-कुंद्रा कुटुंबाची कोरोनावर यशस्वी मात:शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब कोरोनामुक्त, संपूर्ण घर सॅनिटाइज करतानाचा व्हिडिओ केला शेअर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाला वगळता तिच्या घरातील सर्वांना कोरोनाची लागण झाली होती.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे कुटुंब आणि कर्मचारी कोरोनातून बरे झाले आहेत. संपूर्ण कुटुंबाने कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर शिल्पाने आपले संपूर्ण घर सॅनिटाइज करुन घेतले आहे. याची माहिती शिल्पाने स्वतः सोशल मीडिया स्टोरीत घराच्या सॅनिटाइजेशनचा व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "सॅनिटाइजेशन पोस्ट कोविड रिकव्हरी. या दर्जेदार सेवेसाठी 'रिलाएबल शील्ड'चे धन्यवाद."

7 मे रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे शिल्पाने दिली होती माहिती

काही दिवसांपूर्वी शिल्पाला वगळता तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह स्टाफ मेंबर्सनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पती राज कुंद्रा, मुलगा विहान, मुलगी समिषा, आई आणि सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. हे सर्व होम आयसोलेशनमध्ये होते. शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले होते, 'मागील 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझे सासू- सासरे कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यानंतर माझी मुलगी समीषा मग मुलगा विहान यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर माझी आई आणि आता राज. हे सगळे कोरोना निर्बंधानुसार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आयसोलेट आहेत. आम्ही डॉक्टरांचा प्रत्येक सल्ला मानून औषधोपचार करतो आहोत. हे सगळे इतक्यावरच थांबलं नाहीये तर आमच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला आहे आणि त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत,' असे शिल्पाने सांगितले होते.

शिल्पाची चाचणी आली होती निगेटिव्ह

शिल्पाने स्वतःचीदेखील कोविड चाचणी करुन घेतली होती आणि तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. स्वतःची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगत शिल्पाने लिहिले होते, 'देवाच्या कृपेने सगळे लवकर बरे होत आहेत. माझी चाचणी निगेटिव्ह आली आहे. सगळ्या निर्बंधांचे पालन केले जात आहे. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचे आभार मानते. तुमच्यामुळे हे सगळे निभावून नेऊ शकले. माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करा.' सोबतच शिल्पाने सगळ्यांना मास्क वापरण्याचे आवाहन केले होते.

शिल्पाने लिहिले होते, 'तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह नसाल तरीही तुम्ही मास्कचा वापर करा. हात सॅनिटाइज करत राहा आणि सुरक्षित राहा. सगळ्यात महत्वाचे सकारात्मक विचार करा.'

बातम्या आणखी आहेत...