आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Shilpa Shetty Has Filed A Defamation Case Against 29 Institutions, Many News Channels, Websites, YouTube Channels, Google And Facebook Have Been Accused

शिल्पा शेट्टीची हायकोर्टात धाव:शिल्पा शेट्टीने 29 मीडिया हाऊसवर 25 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला, अनेक न्यूज चॅनेल, वेबसाइट्स, यूट्युब, गुगल आणि फेसबुकवर केले आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर आळा घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करुन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिल्पा शेट्टीने केला आहे. याप्रकरणी तिने 29 मीडिया हाऊससह यूट्यूब वाहिन्यांवर 25 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडिया आणि वेबसाईट्सवर प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर आळा घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामलाही आरोपी बनवण्यात आले
शिल्पाने आपल्या या याचिकेत अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात सुरू असलेल्या तपासावर प्रतिक्रिया दिल्याची आणि या प्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आल्याची अनेक उदाहरणे सादर केली आहेत. अश्लील चित्रपट प्रकरणात आपले नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने मीडिया हाऊसनी बिनशर्त माफी मागावी आणि 25 कोटी रुपयांची मानहानीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच बदनामीजनक वृत्तांकन केलेली सर्व माहिती ताबडतोब काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. शिल्पाने फेसबुक, यूट्युब आणि इन्स्टाग्रामविरोधातही खटला दाखल केला आहे.

या प्रकरणात आपल्याला अपराधी असल्याचे दाखवण्यात आले असून पती राज कुंद्रांवर सुरू असलेल्या खटल्यामुळे पतीला सोडून दिले असल्याचे देखील चुकीचे वार्तांकन करण्यात आले असल्याचे तिने म्हटले आहे.

जामिनासाठी राज कुंद्रा उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो
दरम्यान, अश्लील चित्रपट निर्मिती व वितरणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राज कुंद्राची जामीन याचिका मुंबईच्या कोर्टाने फेटाळली आहे. राज कुंद्रा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने आपल्या अटकेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने 28 जुलै रोजी त्याची याचिका फेटाळत त्याला जामीन देण्यास नकार दिला. जामीनासाठी राज कुंद्रा आता उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. अटकेनंतर राज 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत होता. राजविरूद्ध ठोस पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत शिल्पाला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलेली नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञ राज कुंद्राच्या कंपनीच्या बँक खात्यांची चौकशी करीत आहेत. शिल्पा शेट्टी वियान इंडस्ट्रीजमध्ये डायरेक्टर पदावर होती. तसेच ज्या बँक खात्यात पोर्नोग्राफी धंद्यातून पैसे येत होते, त्या खात्याचा वापर शिल्पा शेट्टी करत होती. या कारणास्तव, शिल्पाला अद्याप या प्रकरणात क्लीन चिट मिळालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...