आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Shilpa Shetty Husband Raj Kundra Files Written Notes In Anticipatory Bail Application In Bombay HC; Says Poonam Pandey Sherlyn Chopra Made Erotic Videos For 'commercial Gains'

पॉर्न फिल्म केस:राज कुंद्राचा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, म्हणाला - शर्लिन आणि पूनमने पैसे कमावण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ बनवले

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुंद्राच्या अटकपूर्व जामिनावर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याने पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचीही नावे जोडली गेली आहेत. न्यायालयाने गेल्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

राज कुंद्राच्या कायदेशीर टीमकडून प्रशांत पाटील आणि स्वप्नील अंबुरे यांनी बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत कलम 67 किंवा कलम 67(A) अर्जदार किंवा कोणत्याही सहआरोपीविरुद्ध बनवता येत नाही.

पूनम-शर्लिनने पैसे कमावण्यासाठी व्हिडिओ बनवले
'शर्लिन आणि पूनमने पैसे कमावण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ बनवले आहेत. त्यामुळे राज कुंद्राचा या व्हिडिओंशी काहीही संबंध नाही,' असा युक्तिवाद राज कुंद्राच्या बाजुने कोर्टात करण्यात आला आहे.

वकील प्रशांत पाटील कोर्टात म्हणाले की, 'आम्ही कोर्टात एक निकाल आणि छोटीसी प्रत सादर केली आहे. यात हे व्हिडिओ आयटी कायद्याच्या कलम 67 (अ) अंतर्गत येत नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. एक्सप्लिसिट या शब्दाचा स्पष्ट शब्दात अर्थ असा होतो की ज्यात लैंगिक गोष्टी स्पष्टपणे दाखवण्यात आल्या असतील. तसेच ब्लॅक्स लॉ डिक्शनरीमध्येही जेव्हा दोन लोक एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवतात त्याला फिजिकल सेक्शुअल इक्वॉलिटीबद्दल असे म्हणतात. हे नमूद करण्यात आले आहे.'

वकील स्वप्निल अंबुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेचे व्हिडिओ हे गुन्ह्याचा विषय आहेत, असा युक्तीवाद कोर्टात फिर्यादी पक्षाने केला. मात्र असे कोणतेही व्हिडिओ बनवण्यात किंवा शेअर करण्यात राज कुंद्राची कोणतीही भूमिका नाही, असे रेकॉर्डवर नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोघींनी स्वतः अशाप्रकारचे व्हिडिओ बनवून त्यातून पैसे कमवले आहे, हे सत्य आहे.'

कुंद्राच्या अटकपूर्व जामिनावर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे

मुंबई उच्च न्यायालयाने जुलैमध्ये पॉर्न प्रकरणात शर्लिन आणि पूनम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारला होता. त्यांची याचिका ऐकल्यानंतर, न्यायालयाने घोषित केले की 20 सप्टेंबर 2021 पर्यंत दोघांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. शर्लिन आणि पूनम या दोघांनीही सांगितले होते की, कुंद्राने त्यांना ए-रेटेड चित्रपट शूट करण्यास भाग पाडले. या प्रकरणी कुंद्राच्या अटकपूर्व जामिनावर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता
पॉर्न फिल्म मेकिंग प्रकरणात राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता. मुंबई क्राईम ब्रांचने राज कुंद्रा विरोधात 1,500 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, शर्लिनने राजला बोल्ड कंटेंट इंडस्ट्रीमध्ये ओढल्याचा दावा गेहना वशिष्ठने केला होता. शर्लिन केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी राजवर चिखलफेक करत आहे. गहना म्हणते की, शर्लिन आता शिल्पा शेट्टीला टार्गेट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...