आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती व बिझनेसमन राज कुंद्रा यांनी अलीकडेच मुंबईत एक नवीन रेस्तराँ सुरु केला. अभिनेता आर. माधवनने या रेस्तराँचे इनसाइट फोटो सोशल मीडियावर शेअर करुन या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लॉकडाउननंतर अखेर हा 8000 चौरस फूटांचा बॅस्टियन सुरू झाला आहे. शहरातील सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ येथे मिळते. शिल्पा आणि राज तुम्ही दोघांसाठी मी फार खूश आहे’, असे कॅप्शन माधवनने या फोटोंना दिले आहे. माधवनने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये रेस्तराँचे आलिशान इंटेरिअर पाहायला मिळत आहे.
8000 sqft Bastian is finally open after lockdown 🙏🤗.. best food and desert in town. Congratulations @TheRajKundra and @TheShilpaShetty .. sooo happy for you both . pic.twitter.com/LHSC1OvGVL
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) December 9, 2020
माधवनच्या या पोस्टवर कमेंट करताना चाहतेदेखील शिल्पा शेट्टीला शुभेच्छा देत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी तुमचे अभिनंदन, प्लीज मला डिस्काउंट कुपन द्या.' तर आणखी एका यूजरने लिहिले, 'जस्ट लव बॅस्टियन.'
अलीकडेच शिल्पाने केले नाइट आउटिंग
अलीकडेच शिल्पा शेट्टीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक ग्रुप फोटो शेअर केला होता. ज्यात ती पती राज कुंद्रा, अभिनेता रितेश देशमुख, त्याची पत्नी जेनिलिया डिसूजा आणि रितेशचा भाऊ धीरज देशमुखसोबत दिसली होती. "काल रात्रीविषयी... 9 महिन्यांनंतर माझी पहिली नाइट आउटिंग आणि डिनर. बॅस्टियन, वरळी (मुंबई) येथे मित्रांसोबत जेवण आणि मस्ती करण्याचा क्षण", असे कॅप्शन शिल्पाने फोटो दिले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.