आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न मूव्ही प्रकरण:शिल्पा शेट्टीचा राज कुंद्राच्या कंपनीतून राजीनामा, वियान इंडस्ट्रीजमध्ये डायरेक्टर पदावर होती अभिनेत्री

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी शुक्रवारी तब्बल सहा तास शिल्पा शेट्टीची चौकशी केली.

पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता, पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिल्पा बहुतेक व्यवसायात कुंद्राची भागीदार आहे.

शिल्पाची 6 तास चौकशी केली गेली
कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिचीदेखील पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे. पोलिसांनी शिल्पाला पोलिस ठाण्यात बोलावले नव्हते, परंतु शुक्रवारी गुन्हे शाखेची एक टीम तिच्या घरी पोहोचली होती. पोलिसांनी यावेळी राज कुंद्रालाही सोबत नेले होते आणि सुमारे 6 तास कुंद्रा आणि शिल्पाला एकत्र बसून चौकशी केली गेली.

शिल्पाला कंपनीकडून किती फायदा झाला याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे
शिल्पाही आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणात शिल्पाचा किती सहभाग आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेची टीम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच शिल्पाला कंपनीच्या पैशांचा काही फायदा झाला का, याची चौकशीही गुन्हे शाखेची टीम करीत आहे.

शिल्पाच्या बँक खात्यांची चौकशी
शिल्पाच्या बँक खात्यांची चौकशीही गुन्हे शाखेकडून केली जात आहे. या व्यतिरिक्त शिल्पा शेट्टीने 'वियान इंडस्ट्रीज'च्या डायरेक्टर पदावर किती दिवस काम केले याचा शोध घेण्याचा प्रयत्नही गुन्हे शाखा करत आहे. चौकशीसाठी पोलिस पुन्हा शिल्पाशी संपर्क साधू शकतात.

'वियान इंडस्ट्रीज'मधील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहे गुन्हे शाखा
गुन्हे शाखेचे अधिकारी 'वियान इंडस्ट्रीज'मधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. अ‍ॅप्ससाठी डिजिटल कंटेंट होस्ट करणा-या सर्व्हरमधील डेटा डिलीट करणा-या व्यक्तीचादेखील शोध घेतला जात आहे.

राज कुंद्राच्या खात्यात सट्टेबाजीशी संबंधित कंपनीकडून पैसे ट्रान्सफर केले गेले

फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम डिलीट केलेला डेटा रिस्टोअर करण्याचा देखील प्रयत्न करीत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सट्टेबाजी करणा-या कंपनीकडून कुंद्राच्या खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. पॉर्न प्रोजेक्टमधून होणा-या कमाईचा उपयोग सट्टेबाजीसाठी करण्यात आला होता की नाही, याचीही चौकशी गुन्हे शाखा करेल.

शिल्पाला राजच्या डर्टी गेमची पूर्ण माहिती होती
मीडिया रिपोर्टनुसार, राज कुंद्राचे अ‍ॅडल्ट अ‍ॅप हॉटशॉट्स आणि त्यातील कटेंटविषयीची पूर्ण माहिती शिल्पाला होती. या अ‍ॅपमधून होणा-या कमाईमधील मोठी रक्कम अनेकदा शिल्पाच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती.

कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपवर 20 लाखांहून अधिक सब्सक्राइबर असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शिल्पावर राज कुंद्राची चुकीच्या कामाची माहिती लपवल्याचा आरोप आहे. शिल्पा ही त्याची अ‍ॅडल्ट कंटेंट कंपनी 'केनरीन'मध्ये पार्टनर देखील आहे. ब-याच मुलींनी आपल्या निवेदनात सांगितले की, अभिनयात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांचे शिल्पाशी बोलणे करुन देण्यात आले होते.

कुंद्राने त्याची अटक अवैध असल्याचे म्हटले, उच्च न्यायालयात याचिका केली दाखल
दुसरीकडे राज कुंद्राने आपल्या अटेकविरोधात मुंबई उच्चन्यायालयाचे दार ठोठावले आहे. कुंद्राने त्याची अटक अवैध असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्याला 41A ची नोटिस दिली नव्हती. 41A ही नोटिस पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी असते. जर संबंधित व्यक्तीने या नोटिसचे पालन केले तर त्याला अटक केली जात नाही, केवळ चौकसीसाठी बोलावले जाते.

कुंद्रा 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत
राज कुंद्राची पोलिस कोठडी शुक्रवारी संपणार होती. परंतु कोर्टाने त्याच्या कोठडीत वाढ केली. कुंद्राला 23 जुलै रोजी मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने 27 जुलैपर्यंत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. राज कुंद्रासह त्याचा सहकारी रेयान थार्प यांच्याही पोलिस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ झाली आहे. सध्या कुंद्राला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना भायखळा तुरुंगात ठेवले जाते. फेब्रुवारी 2021 मध्ये समोर आलेल्या पॉर्न मुव्हीज रॅकेट प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी कुंद्राला न्यायालयात हजर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आणखी एक खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, कुंद्रा 121 पॉर्न व्हिडिओ आंतरराष्ट्रीय स्तरावर 9 कोटी रुपयांना विकणार होता.

बातम्या आणखी आहेत...