आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाची मन की बात:शिल्पाने सोशल मीडियावर लिहिले - 'कोणीही भूतकाळात जाऊन पुन्हा नवीन सुरुवात करु शकत नाही'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाने इन्स्टा स्टोरीमध्ये एका पुस्तकाचे पान शेअर केले आहे,

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अलीकडेच सोशल मीडियावर एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे. यात भूतकाळात जाऊन आपण पुन्हा नवीन सुरुवात करु शकत नाही, असे म्हटले आहे. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका पुस्तकाचे पान शेअर केले आहे, ज्यात अमेरिकन लेखक कार्ल बाँड यांनी लिहिलेला कोट आहे. 'कोणीही भूतकाळात जाऊन पुन्हा नवीन सुरुवात करु शकत नाही. परंतु, आपण वर्तमानात एक नवीन सुरुवात करून त्याला एक नवा अंत देऊ शकतो’, असे सांगण्यात आले आहे.

शिल्पाने शेअर केलेल्या कोटमध्ये पुढे सांगण्यात आले आहे, ‘आपण आपला बराच वेळ चुकीचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण करण्यात वाया घालवतो, आपण केलेल्या चुका, ज्या मित्रांना आपण दुखावले. त्याचवेळी आपण परिपक्वता आणि सहनशीलता दाखवली असती किंवा केवळ चांगले व्यवहार ठेवले असते तर, आता आपण कितीही या गोष्टीचा विचार करू शकत असलो तरी आता आपण भूतकाळ बदलू शकत नाही. पण आपण हे सगळे विसरून पुढे जाऊ शकतो, अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो, जुन्या चुका टाळू शकतो आणि आपण आसपासच्या लोकांना चांगली वागणूक देऊ शकतो, पण आता आपल्याकडे स्वत: मध्ये बदल घडवून आणण्यासाठी असंख्य साधणे आहेत. मला आता माझ्या भूतकाळातल्या चुका स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही, मी माझे भविष्य मला जसे पाहिजे तसे घडवू शकते.’

ही पोस्ट शिल्पाने वैष्णोदेवीच्या दर्शनाहून परतल्यानंतर शेअर केली आहे. यापूर्वी तिने तेथील तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्याचवेळी राज कुंद्रा विरुद्ध आरोपपत्रामध्ये 43 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल आहेत. या साक्षीदारांमध्ये शिल्पा शेट्टीच्या नावाचाही समावेश आहे.

राज कुंद्रा 19 जुलैपासून तुरुंगात

राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. सत्र न्यायालयाने कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला. शर्लिन चोप्रापासून पूनम पांडेपर्यंत अनेकांनी राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण मुंबई सायबर पोलिसांकडे 2020 मध्ये नोंदवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...