आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीने शेअर केला योगा व्हिडिओ:व्हीलचेअरवर बसून केला व्यायाम, सांगितली क्रंचेसची योग्य पद्धत

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी योग आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अलीकडेच, तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती व्हील चेअरवर बसून व्यायाम करताना दिसतेय. शिल्पाने या व्हिडिओ आणि कॅप्शनच्या माध्यमातून बेसिक क्रंचेस करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. शिल्पाच्या या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

शिल्पाने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले - 'बसल्या बसल्या काय करावे... सोमवारचा पुरेपूर उपयोग करता यावा यासाठी करुयात थोडा व्यायाम.' यासह तिने क्रंचेस करण्याची योग्य पद्धत आणि काही टिप्स सांगितल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिल्पासोबत शूटिंग सेटवर एक मोठा अपघात झाला होता. शिल्पा तिच्या आगामी वेब सिरीजचे शूटिंग करत होती, तिथे अॅक्शन सीन करताना तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे सध्या शिल्पा व्हीलचेअरवर आहे, हा व्हिडिओ देखील अभिनेत्रीने व्हील चेअरवर बसून बनवला आहे. बघा व्हिडिओ-

बातम्या आणखी आहेत...