आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी गणेशा:शिल्पा शेट्टीने केले गणरायाचे स्वागत, घरी विराजमान होणार लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली गणपतीची मूर्ती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा शिल्पाच्या घरी गणेशोत्सव साजरा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होता.

दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणराया विराजमान होणार आहेत. स्वतः शिल्पा बुधवारी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेली होती. शिल्पाने यंदा लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली गणपतीची मूर्ती घेतली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी शिल्पाचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली. त्यामुळे यंदा शिल्पाच्या घरी गणेशोत्सव साजरा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होता. पण शिल्पाने गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली.

शिल्पा जेव्हा गणपतीची मूर्ती आणण्यासाठी आली तेव्हा फोटोग्राफर्सची गर्दी झाली होती. गणपतीची मूर्ती घरी घेऊन जाताना शिल्पाच्या चेह-यावर आनंद, उत्साह दिसत होता.

शिल्पा जेव्हा गणपतीची मूर्ती घेण्यासाठी पोहोचली तेव्हा खूपच गर्दी झालेली दिसत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...