आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधुरी प्रेमकहाणी:अक्षयने प्रेमात दगा दिल्याने कोलमडली होती शिल्पा शेट्टी, एका मुलाखतीत गंभीर आरोप करताना म्हणाली होती - 'त्याने माझा वापर केला'

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया शिल्पा-अक्षयच्या अधु-या प्रेमकहाणीविषयी...

बॉलिवूडची फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. मॉेडेलिंग विश्वात नाव कमावल्यानंतर 1992 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. गाता रहे मेरा दिल हा शिल्पाचा पहिला चित्रपट होता, मात्र हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर तिने काजोल आणि शाहरुख खान स्टारर बाजीगर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटासाठी शिल्पाला बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस आणि बेस्ट डेब्यू फिमेलचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पुढे तिने मैं खिलाडी तू अनाडीसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका वठवल्या. याशिवाय शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांची लव्ह स्टोरीदेखील चर्चेत राहिली. परंतु या दोघांची लवस्टोरी लग्नापर्यंत पोहोचू शकली नाही. आज शिल्पाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया शिल्पा-अक्षयच्या अधु-या प्रेमकहाणीविषयी...

शिल्पा आणि अक्षय यांनी 1994 मध्ये आलेल्या मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. हळूहळू त्यांच्या रिलेशनशिपची सर्वच चर्चा होऊ लागली. शिल्पापूर्वी अक्षयच्या आयुष्यात रविना टंडन होती. मात्र शिल्पा आयुष्यात आल्यानंतर अक्षयने रविनाकडे पाठ फिरवली होती. असेही म्हटले जाते की, अक्षयने एका मंदिरात रविनासोबत साखरपुडा केला होता. मात्र शिल्पामुळे त्याने साखरपुडा मोडला. मात्र याबद्दल शिल्पाला काहीच ठाऊक नव्हते. अक्षयने नंतर शिल्पासोबतही असेच केले होते.

ट्विंकल आयुष्यात येताच दोघांच्या नात्यात आला दुरावा
असे म्हटले जाते की, शिल्पा आणि अक्षयने मुंबईतील एका मंदिरात साखरपुडा केला होता. मात्र अक्षयच्या आयुष्यात ट्विंकल खन्नाची एंट्री होताच अक्षयने शिल्पाकडेही पाठ फिरवली. अक्षय आणि ट्विंकल यांनी फिल्मफेअर मॅगझिनसाठी एकत्र शूट केले होते, त्याचकाळात अक्षय आणि ट्विंकल यांच्यात जवळीक निर्माण झाली. अखेर 2000 मध्ये शिल्पा आणि अक्षय यांच्यात खटके उडून ही लवस्टोरी संपुष्टात आली. शिल्पाशी ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केले.

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या दोघांमध्ये प्रेम होते. परंतु त्याच सोबत अक्षयचे रविना टंडनसोबतही प्रेमप्रकरण सुरू होते. या दोघींनंतरअक्षयच्या आयुष्यामध्ये ट्विंकल खन्ना आली. या तिघी अभिनेत्री कोणेऐकेकाळी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. शिल्पा शेट्टीने तिच्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमावर थेट आरोपच केले होते.

अक्षयने मला धोका दिला - शिल्पा
अक्षय माझ्याबरोबर डेट करत होता त्याचवेळी तो ट्विंकलाही डेट करत होता, असा खुलासा शिल्पाने केला होता. शिल्पा शेट्टीने ब्रेकअप झाल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'अक्षय कुमारने मला धोका दिला आहे. अक्षय कुमारसोबत भविष्यात मी कधीच काम करणार नाही.' खरे तर त्याच वर्षी अक्षय आणि शिल्पाचा 'धडकन' हा चित्रपट रिलीज झाला होता. जेव्हा शिल्पाला विचारले की तुझी मैत्रिण ट्विंकलवरही तू नाराज आहेस का? त्यावर शिल्पाने उत्तर दिले की 'तिच्याबद्दल मला कोणतीच तक्रार नाही. अक्षयच्या चुकांसाठी ट्विंकलला दोष देणे योग्य नाही.'
अक्षयने माझा वापर केला

या मुलाखतीमध्ये शिल्पाने सांगितले होते, 'अक्षयने माझा वापर केला आणि त्याच्या आयुष्यात आणखी कोणी आल्यानंतर त्याने अगदी सहजपणे मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे त्याच्यावर मी खूप नाराज आहे, कारण त्याने मला धोका दिा आहे. मला विश्वास आहे की येणा-या काळात याचा हिशोब नक्कीच होईल. अक्षयने जे काही केले आहे तेच त्याच्यासोबत घडेल.'

याच मुलाखतीमध्ये शिल्पाने म्हटले होते, 'अक्षयला विसरणे सोपे नव्हते. परंतु या ब्रेकअपच्या धक्क्यातून मी सावरले आहे. अक्षय कुमार हा माझा भूतकाळ आहे. तो माझ्या आयुष्यातील एक प्रकरण असून आता ते मी विसरून गेले आहे. मी यापुढे त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही. त्याच्यासोबत प्रोफेशनली काम करणे कधीच शक्य होणार नाही.'

आयुष्यात आता खुप पुढे गेली आहे शिल्पा
अक्षय कुमारबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यामध्ये अनेक वर्षे कुणीही नव्हते. त्यानंतर 2009 मध्ये तिने राज कुंद्रासोबत लग्न केले. राजचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको कविता कुंद्राला त्याने घटस्फोट दिला आणि शिल्पाशी लग्न केले. आता राज आणि शिल्पाला दोन मुले आहेत. विवान आणि समीशा ही त्यांची नावे आहेत. 2020 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून शिल्पाच्या मुलीचा जन्म झाला. तर दुसरीकडेच अक्षयनेही ट्विंकलसोबत लग्न केले. या दोघांना आरव हा मुलगा आणि नितारा ही मुलगी आहे. एका मोठ्या ब्रेकनंतर शिल्पा आता हंगामा 2 या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...