आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या लग्नाला 12 वर्षे, थ्रोबॅक फोटो शेअर करत शिल्पाने पतीसाठी लिहिली खास पोस्ट

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2009 मध्ये झाले होते शिल्पा आणि राजचे लग्न

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आज 22 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवसाचे औचित्य साधत शिल्पाने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत पती राजला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच तिने राजसाठी एक प्रेमळ मेसेजही लिहिला आहे.

शिल्पाने राजसाठी लिहिली खास पोस्ट
लग्नाचे फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले, '12 वर्षांपूर्वी याच दिवशी आणि याच क्षणी आपण चांगल्या आणि वाईट काळात साथ देण्याचे, एकमेकांवर कायम प्रेम करण्याचे, विश्वास ठेवण्याचे वचन दिले होते. ते असेच सुरु ठेवू, आम्हाला दररोज मार्ग दाखव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुकी राज कुंद्रा. आपल्या मुलांसाठी, अनेक इंद्रधनुष्य, आनंद आणि बरचं काही. चांगल्या आणि वाईट काळात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या आमच्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार”, असे कॅप्शन शिल्पाने दिले आहे.

2009 मध्ये झाले होते शिल्पा आणि राजचे लग्न
नोव्हेंबर 2009 मध्ये शिल्पाने राज कुंद्रासोबत लग्न केले. 10 वर्षांचा मुलगा विआन राज कुंद्रा आणि 1 वर्षाची मुलगी समिशा यांचे शिल्पा आणि राज आईवडील आहेत. राजसाठी गेले काही महिने खूप वाईट गेले, काही महिन्यांपूर्वी राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत होता. 19 जुलै 2021 रोजी अटक त्याला करण्यात आली होती. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 रोजी राजची जामिनावर सुटका झाली होती.

कुंद्राने त्याच्या पॉर्न कंपनीत 10 कोटी रुपये गुंतवले
मुंबई क्राइम ब्रँचच्या म्हणण्यानुसार, या वर्षी फेब्रुवारीमध्ये राजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीत 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या राज कुंद्रा आणि मेहुण्याने तिथे केनरिन नावाची कंपनी स्थापन केली. चित्रपटांचे व्हिडिओ भारतात शूट करण्यात आले आणि ते केनरिनला वी ट्रान्सफर (फाइल ट्रान्सफर सेवा) द्वारे पाठवले गेले. ही कंपनी राज कुंद्राने तयार केली होती आणि भारताच्या सायबर कायद्यापासून वाचण्यासाठी परदेशात नोंदणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...