आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन फन:शिल्पा शेट्टीचा फ्रायडे फन, नव-याला आलू पराठ्यात दिसला नाही बटाटा तर शिल्पाने दिले हे मजेशीर उत्तर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलीकडेच दोघांचा एक टिकटॉक व्हिडिओ समोर आला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हसळखेळत लॉकडाऊनचा काळ घालवत आहे. या काळात ती पती राज कुंद्राबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर करत आहेत. अलीकडेच दोघांचा एक टिकटॉक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांची मजेदार केमिस्ट्री बघायला मिळतेय. 

व्हिडिओमध्ये शिल्पा राजसाठी आलू पराठे बनवते. पण, ते पराठे बघून राज म्हणतो पराठ्यांमध्ये बटाटा कुठे आहे? शिल्पा याचे अतिशय रंजक पद्धतीने उत्तर देते. ती म्हणते, काश्मिरी पुलावात काश्मिर आणि बनारसी साजीत बनारस दिसतो का? एका तासामध्ये या व्हिडिओला 388000 व्ह्यूज मिळाले आहेत. शिल्पाने हा व्हिडिओ फ्रायडे फन या कॅप्शनसह शेअर केला आहे.

दोघांचा हिट है कॉमेडीः यापूर्वी शिल्पा आणि राज यांचा टिकटॉकचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये दोघांची लक्ष वेधून घेणारी केमिस्ट्री दिसतेय.  या व्हिडिओमध्ये राज शिल्पाला विचारतो, जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? याचे उत्तर देताना शिल्पा सांगते - मी निम्मी रक्कम घेईन आणि मी कायमची माहेरी निघून जाईल. हे ऐकून राज आनंदाने उठतो आणि म्हणतो, मला आजच 1000 लॉटरी लागली आहे. अर्धी रक्कम घे आणि निघून जा. 

बातम्या आणखी आहेत...